घरक्रीडाIPL 2021 : राजस्थानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; शाहरुख खानचे पदार्पण 

IPL 2021 : राजस्थानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; शाहरुख खानचे पदार्पण 

Subscribe

पंजाब किंग्सकडून जाय रिचर्डसन आणि रायली मेरेडीच हे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज, तसेच फलंदाज शाहरुख खान आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेला हा सामना सॅमसनसाठी खास आहे. राजस्थानचा कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना आहे. त्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात चेतन सकारिया आणि मनन वोहरा हे दोघे राजस्थानकडून पदार्पण करणार आहेत. तसेच राजस्थानने क्रिस मॉरिस, बेन स्टोक्स, जॉस बटलर आणि मुस्ताफिझूर रहमान या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्सकडून जाय रिचर्डसन आणि रायली मेरेडीच हे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज, तसेच फलंदाज शाहरुख खान आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचेही मैदानात पुनरागमन झाले आहे. कर्णधार लोकेश राहुल हा मयांक अगरवालच्या साथीने सलामीला येणार असून क्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे सोपे जात असल्याने आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती, असे नाणेफेकीच्या वेळी पंजाबचा कर्णधार राहुल म्हणाला.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -