घरक्रीडाIPL 2021 : धोनी म्हणतो, जाडेजाला फलंदाजीला पाठवताना आता विचार करावा लागत...

IPL 2021 : धोनी म्हणतो, जाडेजाला फलंदाजीला पाठवताना आता विचार करावा लागत नाही, कारण…  

Subscribe

जाडेजाने बंगळुरूविरुद्ध अवघ्या २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली.

रविंद्र जाडेजाच्या फलंदाजीत मागील काही वर्षांत झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी आहे, असे म्हणत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूची स्तुती केली. रविवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात जाडेजा चेन्नईसाठी मॅचविनर ठरला. त्याने गोलंदाजीत तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. परंतु, त्याच्या फलंदाजीचे विशेष कौतुक झाले. त्याने या सामन्यात अवघ्या २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. तसेच त्याने हर्षल पटेलने टाकलेल्या डावातील अखेरच्या षटकात ३७ धावा चोपून काढल्या. त्यामुळे सामन्यानंतर धोनीने त्याचे कौतुक केले.

खेळात बदल झाला

- Advertisement -

जाडेजा आता मॅचविनर झाला आहे. आपल्या संघाला एकहाती सामना जिंकवून देण्याची त्याच्यात क्षमता आहे. मागील काही वर्षांत त्याच्या फलंदाजीत झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या खेळात बदल झाला आहे. त्यामुळे आता त्याला खेळपट्टीवर जास्त वेळ देताना किंवा त्याला जास्त चेंडू खेळू देण्यासाठी आम्हाला विचार करावा लागत नाही, असे धोनी म्हणाला.

जाडेजा फलंदाज म्हणून यशस्वी

यंदाच्या मोसमात गोलंदाजांना डावखुऱ्या फलंदाजांना रोखणे अवघड गेले आहे. त्यामुळे आम्ही या सामन्यात जाडेजाला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय घेतल्याचेही धोनीने सांगितले. मागील दोन-तीन वर्षांत आयपीएल, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाडेजा फलंदाज म्हणून यशस्वी ठरला आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -