Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : RCB च्या आणखी एका खेळाडूला कोरोना

IPL 2021 : RCB च्या आणखी एका खेळाडूला कोरोना

आठही फ्रेंचायझींना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेवरील कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधी आठही फ्रेंचायझींना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता आरसीबीचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्सचाही कोरोनाची बाधा झाली आहे. आरसीबीने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय सॅम्स ३ एप्रिलला भारतात दाखल झाला आणि त्यावेळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याची दुसऱ्यांदा चाचणी झाली, तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

कोरोनाची लक्षणे नाहीत

सॅम्सची ७ एप्रिलला दुसऱ्यांदा कोरोना चाचणी झाली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला कोरोनाची लक्षणे नाहीत (असिम्प्टोमॅटिक) आणि तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मेडिकल टीम सतत त्याच्या संपर्कात असून त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे, असे आरसीबीकडून सांगण्यात आले. सॅम्स मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. मात्र, मोसमाच्या सुरुवातीला दिल्लीने त्याला आरसीबी संघात पाठवण्याचा (ट्रेड) निर्णय घेतला.

पडिक्कल संघात दाखल 

- Advertisement -

आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलचा २२ मार्चला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो त्याच्या घरीच क्वारंटाईनमध्ये होता. मात्र, आता त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो चेन्नई येथे आरसीबी संघात दाखल झाला आहे. आयपीएलची सलामीची लढत ९ एप्रिल होणार असून आरसीबीसमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.

- Advertisement -