Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : कोहलीने टाकले रैना, रोहितला मागे; रचला अनोखा विक्रम 

IPL 2021 : कोहलीने टाकले रैना, रोहितला मागे; रचला अनोखा विक्रम 

कोहलीने आतापर्यंत १९६ सामन्यांत ३८.३५ च्या सरासरीने ६०२१ धावा फटकावल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आणि एखादा विक्रम झाला नाही, असे फार कमी वेळा होते. कोहलीने आयपीएल स्पर्धेत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आयपीएलमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला असून ही कामगिरी करणारा तो या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. गुरुवारी आयपीएलमध्ये बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात कोहलीने ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला.

९६ सामन्यांत ६०२१ धावा

आयपीएलमध्ये ६ हजार धावा करणारा कोहली पहिलाच फलंदाज ठरला आहे. तो आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून बंगळुरूकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत १९६ सामन्यांत ३८.३५ च्या सरासरीने ६०२१ धावा फटकावल्या आहेत. यात ४० अर्धशतके आणि ५ शतकांचा समावेश आहे. तसेच एका मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रमही कोहलीच्याच नावे आहे. त्याने २०१६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना १६ सामन्यांत चार शतकांसह ९७३ धावा केल्या होत्या.

- Advertisement -

most runs in ipl
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज  

 

- Advertisement -