Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : निळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार विराट कोहलीचा RCB संघ

IPL 2021 : निळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार विराट कोहलीचा RCB संघ

Related Story

- Advertisement -

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होतेय. या पर्वातील खेळी पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक असून खेळाडूंनी य़ुएई गाठले आहे. विराट कोहलीसह मोहम्मद सिराज हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रमुख खेळाडू लंडनहून दुबईत दाखल झालेत. मात्र २० सप्टेंबरला कोलकात्ता नाइट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात RCB च्या संघात मोठे बदल झालेल्याचे पाहायला मिळत आहेत. तर इतर संघांनीही अनेक बदल करत नवे संघ जाहीर केले आहेत. मात्र RCB संघातील एका मोठ्या बदलाची सध्या जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

प्रत्येक पर्वाच्या एका सामन्यात आरसीबी संघ हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरतो. यातून निसर्गाचे संरक्षण करण्याचा सामाजिक संदेश आरसीबी सामन्यातून देतो. पण आता विराटचा हा संघ हिरव्या नाही तर निळ्या रंगात मैदानात उतरणार आहे. आरसीबीने या नव्या निळ्या रंगातील जर्सीचा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत याची माहिती दिली. तसेच या रंगामागील कारणही सांगितले.

या निळ्या जर्सीतून RCB चा संघ कोरोनाविरोधात लढ देणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करणार आहेत. . या जर्सीचा निळा रंग पीपीई किटला उद्दशून असल्याने कोरोनाच्या संकटात पीपीई किट घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सला पाठींबा दिला जाईल.

- Advertisement -

आरसीबी संघाने केले नवे बदल

आरसीबी संघाने सर्वात मोठा केलेला बदल म्हणजे त्यांनी श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला टफ देणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंद हसरंगा याला करारबद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला घेण्यात आलेय. यासह केन रिचर्डसनच्या बदली दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात स्थान दिलेय. याशिवाय फिन एलनच्या जागी टीम डेव्हिडला घेण्यात आले आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.

आरसीबी संघाचं उर्वरीत आयपीएलमधील वेळापत्रक

१)  20 सप्टेंबर: आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता

२)  24 सप्टेंबर: आरसीबी vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता

३) 26 सप्टेंबर : आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता

४)  29 सप्टेंबर : आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता

५) 03 ऑक्टोबर : आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता

६) 06 ऑक्टोबर : आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता

७)  08 ऑक्टोबर : आरसीबी vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता


लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह ‘शांताबाई’फेम संजय लोंढे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

- Advertisement -