घरक्रीडाIPL 2021 : कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज!

IPL 2021 : कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज!

Subscribe

बंगळुरूची कोलकाता नाईट रायडर्स संघाशी टक्कर होणार आहे.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाची दमदार सुरुवात केली आहे. त्यांना आपले पहिले दोन्ही सामने जिंकण्यात यश आले असून यंदाच्या मोसमात ही कामगिरी करणारा बंगळुरू हा एकमेव संघ आहे. बंगळुरूने आपल्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सला, तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले. आता रविवारी त्यांची कोलकाता नाईट रायडर्स संघाशी टक्कर होणार असून हा सामना जिंकत विजयाची हॅटट्रिक करण्याचा कोहलीच्या संघाचा प्रयत्न असेल.

दुपारी ३.३० वाजता सामना

बंगळुरू आणि कोलकाता यांच्यात चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत खेळवला जाणारा यंदाच्या मोसमातील हा पहिलाच सामना असेल. बंगळुरूने आपले पहिले दोन्ही सामने जिंकल्याने या सामन्यातही त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यातच या दोन संघांमधील मागील तिन्ही सामने बंगळुरूनेच जिंकले आहेत. असे असले तरी या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या २६ सामन्यांपैकी १४ सामने कोलकाताने जिंकले असून बंगळुरूला १२ सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे रविवारच्या सामन्यात बंगळुरूचे पारडे जड असले तरी कोलकाताचा संघ त्यांना नक्कीच झुंज देईल.

- Advertisement -

कोलकाता बंगळुरूला रोखणार?

बंगळुरूच्या पहिल्या दोन्ही विजयांमध्ये ग्लेन मॅक्सवेलने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याचा चांगली कामगिरी सुरु ठेवण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे कोलकाताने यंदाच्या मोसमाची विजयाने सुरुवात केली होती. त्यांनी सनरायजर्स हैदराबादवर मात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत केले. आता कोलकाताचा संघ बंगळुरूविरुद्ध त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल. त्यामुळे बंगळुरू त्यांची विजयी घोडदौड सुरु ठेवणार की कोलकाता त्यांना रोखणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -