Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 MI vs RCB : कोहलीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; लिनला...

IPL 2021 MI vs RCB : कोहलीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; लिनला पदार्पणाची संधी 

आयपीएलची सलामीची लढत आज होत आहेत. 

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १४ व्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली. सलामीची लढत रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु, असे असले तरी त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार असल्याचे कर्णधार कोहलीने सांगितले. तसेच आरसीबीकडून या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि कायेल जेमिसन हे परदेशी खेळाडू पदार्पण करणार आहेत.

लिन, जेन्सन करणार पदार्पण

दुसरीकडे मुंबई इंडियन्स या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिसेल. मात्र, या सामन्यात रोहितच्या साथीने क्विंटन डी कॉक नाही, तर ऑस्ट्रेलियन क्रिस लिन मुंबईच्या डावाची सुरुवात करेल. मुंबईकडून लिन आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनला पदार्पणाची संधी मिळणार आहे. हा सामना चेन्नईत होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही.

- Advertisement -

- Advertisement -