Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : धोनीकडून शिकलेल्या गोष्टी त्याच्याविरुद्ध वापरण्यास रिषभ पंत उत्सुक!

IPL 2021 : धोनीकडून शिकलेल्या गोष्टी त्याच्याविरुद्ध वापरण्यास रिषभ पंत उत्सुक!

पंत यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करणार आहे.    

Related Story

- Advertisement -

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतची आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला यंदाच्या मोसमातून माघार घेणे भाग पडले. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत पंत आता दिल्लीचे नेतृत्व करणार असून संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. यंदा दिल्लीचा पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होणार आहे. पंत कर्णधार म्हणून पदार्पणात धोनीविरुद्ध खेळण्यासाठी आणि धोनीने शिकवलेल्या गोष्टी त्याच्याविरुद्ध वापरण्यासाठी उत्सुक आहे.

काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न

यंदा मला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. त्यातच कर्णधार म्हणून माझा पहिलाच सामना माही भाईविरुद्ध (धोनी) असणार आहे. या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो आहे. तसेच मला माझ्या कारकिर्दीतही विविध अनुभव आले आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा फायदा करून घेत कर्णधार म्हणून मला चांगली कामगिरी करायची आहे. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात काही तरी नवे आणि वेगळे करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे पंत म्हणाला.

दोन-तीन वर्षांत चांगली कामगिरी

- Advertisement -

पंतने २०२१ वर्षाच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली आहे. आता त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करण्यास तो उत्सुक आहे. दिल्लीने अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे यंदा हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही मागील दोन-तीन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. तसेच आम्ही यंदाच्या मोसमासाठी खूप तयारी केली आहे. त्यामुळे आमचे खेळाडू दमदार कामगिरीसाठी सज्ज आहेत, असेही पंतने सांगितले.

- Advertisement -