Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : रोहित vs धोनी! चेन्नईची विजयी घोडदौड मुंबई रोखणार?

IPL 2021 : रोहित vs धोनी! चेन्नईची विजयी घोडदौड मुंबई रोखणार?

चाहत्यांमध्ये या दोन संघांमधील सामन्याबाबत नेहमीच खूप उत्सुकता असते.

Related Story

- Advertisement -

आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये सामना होणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वात दोन यशस्वी संघ आहेत. रोहित शर्माच्या मुंबईने आतापर्यंत पाच वेळा, तर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने तीनदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोन संघांमधील सामन्याबाबत नेहमीच खूप उत्सुकता असते. चेन्नईने आयपीएलच्या मागील मोसमात निराशाजनक खेळ केला होता. त्यांना पहिल्यांदा प्ले-ऑफ गाठण्यात अपयश आले होते. मात्र, यंदाच्या मोसमात धोनीच्या या संघाने दमदार पुनरागमन केले आहे. त्यांनी आतापर्यंत ६ पैकी ५ सामने जिंकले असून ते गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे चेन्नईची ही विजयी घोडदौड मुंबई रोखणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

जाडेजा, मोईनवर अवलंबून

चेन्नईने यंदाच्या मोसमात अप्रतिम खेळ केला आहे. त्यांनी मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत यंदाच्या मोसमातील पाचव्या विजयाची नोंद केली. त्या सामन्यात फॅफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी अर्धशतके केली होती. फॅफचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. तो मुंबईविरुद्धही चांगली कामगिरी सुरु ठेवेल अशी चेन्नईला आशा असेल. तसेच चेन्नईचा संघ पुन्हा मोईन अली आणि रविंद्र जाडेजा या अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल.

मुंबई सलग दुसरा विजय मिळवणार?

- Advertisement -

मुंबईला यंदाच्या मोसमात अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले आहे. मात्र, मागील सामन्यात मुंबईने चांगला खेळ केला. त्यांनी राजस्थान रॉयल्सला ७ विकेट राखून पराभूत केले. हा मुंबईचा सहा सामन्यांत तिसरा विजय ठरला. मुंबईच्या या विजयात क्विंटन डी कॉकने नाबाद ७० धावा करत महत्वाची भूमिका बजावली होती. आता त्याला रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, पोलार्ड आणि पांड्या बंधूंची साथ लाभल्यास मुंबईचा संघ सलग दुसरा विजय मिळवू शकेल.

- Advertisement -