Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : कोहलीच्या RCB ची गोलंदाजी; पंजाबच्या संघात तीन बदल

IPL 2021 : कोहलीच्या RCB ची गोलंदाजी; पंजाबच्या संघात तीन बदल

वॉशिंग्टन सुंदरला वगळून डावखुरा फिरकीपटू शाहबाझ अहमदला बंगळुरूने संघात स्थान दिले आहे.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने यंदाच्या मोसमात अप्रतिम खेळ केला असून त्यांना सहा पैकी पाच सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यांनी मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी संघात मोठे बदल करणे टाळले आहे. त्यांच्या संघात केवळ एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरला वगळून डावखुरा फिरकीपटू शाहबाझ अहमदला बंगळुरूने संघात स्थान दिले आहे.

मयांक अगरवालला दुखापत 

दुसरीकडे पंजाबचा संघ विजयाच्या शोधात आहे. त्यांना यंदा सहा पैकी केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. त्यातच त्यांचा सलामीवीर मयांक अगरवालला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. पंजाबने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. मयांक, मोईसेस हेन्रिक्स आणि अर्शदीप सिंगच्या जागी प्रभसिमरन सिंग, रायली मेरेडीच आणि हरप्रीत ब्रार यांना संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -