Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : अहमदाबादमध्ये आधी डिव्हिलियर्स, मग वाळूचं वादळ!

IPL 2021 : अहमदाबादमध्ये आधी डिव्हिलियर्स, मग वाळूचं वादळ!

मैदानात जोरात वाळू उडू लागल्याने दिल्लीचा डाव सुरु होण्यासाठी थोडा वेळ लागला.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली. बंगळुरूने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. मात्र, एबी डिव्हिलियर्सने अप्रतिम फलंदाजी करत बंगळुरूला १७० धावांचा टप्पा पार करून दिला. एबीने ४२ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची वादळी खेळी केली. बंगळुरूचा डाव संपल्यावर खेळाडू डागआऊटमध्ये गेले आणि त्यांना काही काळ तिथेच थांबावे लागले. याचे कारण म्हणजे अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये वाळूचे वादळ आले.

खेळाडूंनी चेहरे झाकून घेतले

मैदानात जोरात वाळू उडू लागल्याने दिल्लीचा डाव सुरु होण्यासाठी थोडा वेळ लागला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपल्या जर्सीने स्वतःचे चेहरे झाकून घेतले. हे वाळूचे वादळ साधारण १० मिनिटे राहिले. याचा व्हिडिओही आयपीएलच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला. अखेर पंचांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सामन्याला पुन्हा सुरुवात केली. त्यांनी दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांना मैदानात बोलावले.

- Advertisement -

 

- Advertisement -