घरक्रीडाIPL 2021 : भारताच्या काही सिनियर खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत! मुंबईच्या प्रशिक्षकाचे...

IPL 2021 : भारताच्या काही सिनियर खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत! मुंबईच्या प्रशिक्षकाचे वादग्रस्त विधान

Subscribe

कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केला हे खरे असले तरी त्याआधी आम्हाला भारतात पूर्णपणे सुरक्षित वाटत होते.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेसाठी भारतामध्ये तयार करण्यात आलेले बायो-बबल असुरक्षित होते, असे विधान काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाने केले होते. परंतु, मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅमेन्ट हे झॅम्पाच्या मताशी सहमत नाही. कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केला हे खरे असले तरी त्याआधी आम्हाला भारतात पूर्णपणे सुरक्षित वाटत होते, असे पॅमेन्ट यांनी स्पष्ट केले. बायो-बबलमध्ये असताना खेळाडूंना बऱ्याच नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करावे लागते. परंतु, भारताच्या काही सिनियर खेळाडूंना सूचना केलेले फारसे आवडत नसल्याचेही पॅमेन्ट म्हणाले.

प्रवास करणे आव्हानात्मक

भारताच्या काही सिनियर खेळाडूंना त्यांच्यावर निर्बंध लादलेले आणि सतत सूचना केलेले फारसे आवडत नाही. मात्र, आम्हाला भारतामध्ये पूर्णपणे सुरक्षित वाटत होते. बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होईल किंवा आमच्या जीवाला धोका असेल आम्हाला कधीही वाटले नाही. परंतु, प्रवास करताना आम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागू शकेल याचा अंदाज होता, असे पॅमेन्ट यांनी सांगितले.

- Advertisement -

आमचे खेळाडू थोडे घाबरले

बायो-बबलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची बाधा होत असल्याचे समजल्यावर आमची चिंता वाढली. चेन्नई सुपर किंग्सच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. त्याआधीच काही दिवस आम्ही चेन्नईविरुद्ध खेळलो होतो. त्यामुळे आमचे खेळाडू थोडे घाबरले होते. मी जास्त काळ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत घालवायचो. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याचे कळल्यावर त्यांच्या मानसिकतेत नक्कीच बदल झाला होता, असेही मुंबईचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पॅमेन्ट म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -