सनरायजर्स हैदराबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या उर्वरित मोसमाला मुकावे लागणार आहे. नटराजनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. नटराजनची यावर्षाच्या सुरु
🗣️ “I’m sad to miss the remaining games this season.”@Natarajan_91 has been ruled out of the tournament due to injury and we along with the entire squad wish him a speedy recovery 🧡#OrangeOrNothing #OrangeArmy #IPL2021 pic.twitter.com/b4mzS3Rfrp
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2021
स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या
मला उर्वरित मोसमात खेळता येणार नसल्याचे दुःख आहे. मी मागील मोसमात चांगली कामगिरी केली होती आणि त्या कामगिरीच्या आधारे माझी भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे यंदा मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, आता माझ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने मला उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे, असे नटराजन म्हणाला.
केवळ दोन सामने खेळला
नटराजनला यंदा केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. तो कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांविरुद्ध खेळला. मात्र, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी खलील अहमदला संधी मिळाली. बुधवारी हैदराबादने मोसमातील पहिला विजय नोंदवल्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नरला नटराजनविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत असल्याचे वॉर्नर म्हणाला होता.