Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : देवदत्त पडिक्कलचे RCB संघात पुनरागमन; हैदराबादची गोलंदाजी 

IPL 2021 : देवदत्त पडिक्कलचे RCB संघात पुनरागमन; हैदराबादची गोलंदाजी 

सनरायजर्स हैदराबादने संघात दोन बदल केले.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सामना होत आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हैदराबादला यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केले होते. या सामन्यात वेगवान गोलंदाज संदीप शर्माला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या आजच्या सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले आहे. हैदराबादने संघात दोन बदल केले असून संदीप आणि मोहम्मद नबीच्या जागी शाहबाझ नदीम आणि जेसन होल्डर यांची निवड झाली आहे.

पाटीदार संघातून आऊट  

दुसरीकडे आरसीबीने संघात एक बदल केला आहे. डावखुरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलचे आरसीबीच्या संघात पुनरागमन झाले आहे. पडिक्कलला यंदाच्या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी काही दिवस कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता मात्र तो संघात परतला असून रजत पाटीदारला संघातून वगळण्यात आले आहे. कर्णधार विराट कोहली आणिपडिक्कल आरसीबीच्या डावाची सुरुवात करणार असून शाहबाझ अहमद तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

- Advertisement -

- Advertisement -