घरक्रीडाIPL 2021 : परदेशी खेळाडू असोत वा नसोत, उर्वरित मोसम होणारच; बीसीसीआय...

IPL 2021 : परदेशी खेळाडू असोत वा नसोत, उर्वरित मोसम होणारच; बीसीसीआय उपाध्यक्षांनी केले स्पष्ट

Subscribe

जे परदेशी खेळाडू खेळणार नसतील, त्यांच्याविनाही आयपीएल स्पर्धा होणारच आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा उर्वरित मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी आणि नंतर बरेच आंतरराष्ट्रीय सामने होणार असल्याने बऱ्याच देशांचे प्रमुख खेळाडू आयपीएलच्या उर्वरित मोसमाला मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आधीच सांगितले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सहभागाबाबतही साशंकता आहे. परंतु, परदेशी खेळाडू असोत किंवा नसोत, आयपीएलचा उर्वरित याच वर्षी होणार असल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.

क्रिकेट बोर्ड खेळाडूंना रोखण्याची शक्यता

आयपीएलचा मोसम पूर्ण करणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे जे परदेशी खेळाडू उर्वरित मोसमात खेळण्यासाठी उपलब्ध असतील, त्यांचे आम्ही स्वागत करू. मात्र, जे परदेशी खेळाडू खेळणार नसतील, त्यांच्याविनाही आयपीएल स्पर्धा होणारच आहे, असे शुक्ला यांनी एका मुलाखतीत सांगितले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप होणार आहे. त्याआधी आयपीएलमध्ये खेळून खेळाडूंना थकवा जाणवू शकेल किंवा दुखापती होऊ शकतील. त्यामुळे विविध क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यापासून रोखण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सहभागाबाबत चर्चा नाही 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएलच्या उर्वरित मोसमात खेळण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चर्चा केली नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारी सांगितले होते. आयपीएल स्थगित झाल्यावर मायदेशी परतलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू आताच क्वारंटाईनमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून देण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. तसेच आमचा संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्याची तयारी करण्यावरही आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे आयपीएलबाबत अजून निर्णय झालेला नाही, असे हॉकली म्हणाले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -