घरक्रीडाIPL 2021 : टीम डेविड ठरणार आयपीएलमध्ये खेळणारा सिंगापूरचा पहिला खेळाडू

IPL 2021 : टीम डेविड ठरणार आयपीएलमध्ये खेळणारा सिंगापूरचा पहिला खेळाडू

Subscribe

बंगळुरूने उर्वरित मोसमासाठी डेविडला करारबद्ध केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एक सिंगापूरचा खेळाडू खेळताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने उर्वरित आयपीएल मोसमासाठी संघात मोठे बदल केले आहेत. बंगळुरूचे पाच परदेशी खेळाडू उर्वरित मोसमाला मुकणार असून तीन नव्या खेळाडूंना बंगळुरूने करारबद्ध केले आहे. यात मलेशियाच्या टीम डेविडचाही समावेश आहे. डेविडने जगभरातील विविध टी-२० स्पर्धांत खेळताना दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन वंशाच्या डेविडने आतापर्यंत मलेशियाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १४ सामन्यांत ४६.५० च्या सरासरीने आणि १५८.५२ च्या स्ट्राईक रेटने ५५८ धावा केल्या आहेत. तसेच तो उपयुक्त फिरकीपटूही आहे.

२५ वर्षीय डेविड हा त्याच्या आक्रमक शैलीतील फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीग यांसारख्या स्पर्धांमध्ये खेळताना ४९ टी-२० सामन्यांत ११७१ धावा केल्या आहेत. बिग बॅश लीगमध्ये त्याने पर्थ स्कॉचर्स आणि होबार्ट हरिकेन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच इंग्लंडमधील रॉयल लंडन कप एकदिवसीय स्पर्धेत सरे संघाकडून खेळताना दोन शतकेही केली आहेत. वॉर्विकशायर संघाविरुद्ध १४० धावांची खेळी ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

- Advertisement -

डेविडचे वडील रॉड डेविड यांनीही सिंगापूरचे प्रतिनिधित्व केले होते. डेविडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. त्याच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे स्थायिक झाले. डेविडला यंदा आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. त्याच्या समावेशाने बंगळुरूचे प्रशिक्षक माईक हेसन खुश होते. ‘आम्ही गरज भासल्यास ग्लेन मॅक्सवेल किंवा एबी डिव्हिलियर्सच्या जागी डेविडला संधी देऊ शकतो. आम्ही विविध पर्यायांचा विचार करू शकतो,’ असे हेसन म्हणाले.


हेही वाचा – IPL 2021 : उर्वरित मोसमासाठी RCB संघात मोठे बदल 

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -