घरक्रीडाIPL 2021 : विराटने मला 'त्या'वेळीच RCB कडून खेळण्याबाबत विचारले होते -...

IPL 2021 : विराटने मला ‘त्या’वेळीच RCB कडून खेळण्याबाबत विचारले होते – मॅक्सवेल

Subscribe

आरसीबीने मॅक्सवेलला १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावांची मजल मारली. त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. मॅक्सवेलला आयपीएलच्या मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, असे असतानाही यंदाच्या खेळाडू लिलावात आरसीबीने त्याला तब्बल १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. आरसीबी खेळाडू लिलावात आपल्याला खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे याचा मॅक्सवेलला आधीच अंदाज होता. याचे कारण म्हणजे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने त्याला आरसीबीकडून खेळण्याविषयी विचारले होते.

एकदिवसीय, टी-२० मालिकेदरम्यान चर्चा

मी आणि विराटने बरेचदा एकमेकांना मेसेज केला होता. तसेच भारतीय संघाने यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान आम्ही चर्चा केली होती. त्यावेळी विराटने मला आरसीबीकडून खेळण्याविषयी विचारले होते. ‘आम्हाला संधी मिळाली, तर आम्ही तुला नक्की संघात घेऊ,’ असे विराटने मला सांगितले होते. मात्र, लिलावात काय होणार हे सांगणे अवघड असते. परंतु, आरसीबीने मला संघात घेतले याचा आनंद आहे, असे मॅक्सवेल म्हणाला.

- Advertisement -

सनरायजर्सविरुद्ध अर्धशतकी खेळी

आयपीएल खेळाडू लिलावात आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरु होती. अखेर आरसीबीने त्याला १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. मॅक्सवेलने यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात ३९ धावांची खेळी केली होती. तर सनरायजर्सविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -