Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : आम्हाला मायदेशी परतण्याची चिंता नाही! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना पॉन्टिंगचे प्रत्युत्तर 

IPL 2021 : आम्हाला मायदेशी परतण्याची चिंता नाही! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना पॉन्टिंगचे प्रत्युत्तर 

भारतात जी परिस्थिती आहे, त्याच्या तुलनेत आम्ही मायदेशी कसे परतणार ही समस्या खूपच छोटी असल्याचे पॉन्टिंग म्हणाला. 

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित केली आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होणे हा चिंतेचा विषय असून ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी केली होती. तसेच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागणार असल्याचे मॉरिसन यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानाला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने प्रत्युत्तर दिले आहे. भारतात जी परिस्थिती आहे, त्याच्या तुलनेत आम्ही मायदेशी कसे परतणार ही समस्या खूपच छोटी असल्याचे पॉन्टिंग म्हणाला.

आम्ही खूप भाग्यवान

सध्या भारतात असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि इतर सदस्यांच्या मायदेशी परतण्यावरून ऑस्ट्रेलियन सरकारने काही विधाने केली आहेत. त्यांच्या अशा विधानांमुळे आमचे लक्ष थोडे विचलित झाले आहे. मात्र, आम्ही मायदेशी कसे परतणार, याची आम्हाला चिंता नाही. आम्ही दररोज भारतात काय सुरु आहे त्याचा विचार करतो. या परिस्थितीतही आम्हाला आमची आवडीची गोष्ट करायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत, असे पॉन्टिंग म्हणाला.

बाहेरील परिस्थितीबाबत सतत चर्चा

- Advertisement -

आम्ही बायो-बबलमध्ये आहोत. मात्र, या बबलच्या बाहेरील, भारतातील परिस्थितीची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. भारतात कोरोनाला लढा देणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या संघातील अश्विननेही या स्पर्धेतून माघार घेतली. त्याचे कुटुंब कोरोनाला लढा देत आहे. त्यामुळे आम्ही संघ म्हणून बाहेरील परिस्थितीबाबत सतत चर्चा करत असतो, असेही पॉन्टिंगने सांगितले.

- Advertisement -