Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : यंदाचा मोसम ठरल्याप्रमाणेच होणार; गांगुलीने व्यक्त केला विश्वास

IPL 2021 : यंदाचा मोसम ठरल्याप्रमाणेच होणार; गांगुलीने व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाबाबत प्रश्नचिन्ह आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू अक्षर पटेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल या खेळाडूंसह मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, असे असले तरी आयपीएल स्पर्धा ठरल्याप्रमाणेच होणार आहे, असे भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले.

ग्राऊंड स्टाफही स्टेडियममध्येच राहील

तसेच मुंबईतही सामने ठरल्याप्रमाणे होणार असल्याचा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव संजय नाईक यांनी व्यक्त केला. वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी ज्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये ठेवण्यात येईल. आयपीएलसाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवण्यात येणार असून ग्राऊंड स्टाफही मुंबईतील आयपीएलचे सामने होईपर्यंत स्टेडियममध्येच राहील, असे संजय नाईक म्हणाले.

दर दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी

- Advertisement -

बीसीसीआय आमच्या ग्राऊंड स्टाफची दर दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी करत आहे. आयपीएलचे सामने हे प्रेक्षकांविना होणार आहेत. तसेच खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात राहतील. त्यामुळे मुंबईत आयपीएलचे सामने ठरल्याप्रमाणे होतील असा मला विश्वास असल्याचेही संजय नाईक यांनी एका मुलाखतीत नमूद केले.

 

- Advertisement -