IPL 2022 Auction : अंडर-१९ कर्णधार यश धुल पडला मागे, संघातील दोन खेळाडू ठरले करोडपती

राजवर्धन हैंगरगेकरसाठी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते, पण चेन्नई सुपर किंग्जने त्याला दीड कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केले.

IPL 2022 Auction yash dhul and raj bawa get highest price in ipl auction
IPL 2022 Auction : अंडर-१९ कर्णधार यश धुल पडला मागे, संघातील दोन खेळाडू ठरले करोडपती

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 लिलाव, 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता, या लिलावात अंडर-१९ टीम मधील खेळाडूंना मोठी रक्कम मिळण्याची शक्यता होती आणि तसेच झाले आहे. आयपीएलच्या लिलावात अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ८ खेळाडूंचा समावेश आहे. ज्यामध्ये आतापर्यंत तीन खेळाडूंची जागा पक्की झाली आहे. भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार यश धुल लिलावात मागे पडला आहे. त्याला केवळ 50 लाख रुपयांना घेण्यात आले आहे. तर संघातील राज अंगद बावाला मोठी 2 कोटी अशी मोठी रक्कम मिळाली आहे. बावाला पंजाब किंग्जने खरेदी केले आहे. यानंतर राजवर्धन हैंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्जने 1.5 कोटी रुपयांना खरेदी करुन आपल्या संघात सहभागी केले आहे.

राज अंगद बावासाठी पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनराजयझर्स हैदराबादकडून बोली लावण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने अनेकदा बोली लावली परंतु पंजाब किंग्जने शेवटी त्याला आपल्या संघात घेतलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात राज बावा सामनावीर ठरला होता. त्याने अंतिम सामन्यात ५ विकेट घेत ३५ धावा दिल्या होत्या.

पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादने राज अंगद बावासाठी बोली लावली. मुंबई इंडियन्सने अनेक वेळा बोली लावली पण शेवटी पंजाब किंग्जने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. अंतिम सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी राज बावा सामनावीर ठरला. अंतिम सामन्यात 5 विकेट्स घेण्यासोबतच बावाने फलंदाजीत 35 धावांची उपयुक्त खेळीही खेळली.

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील स्टार बावा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट घेतल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच्या वडिलांनी माजी अष्टपैलू युवराज सिंगचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्याने लीग टप्प्यात युगांडविरुद्ध 108 चेंडूत नाबाद 162 धावांची खेळी केली, जी या स्पर्धेतील कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. बावाने स्पर्धेतील 6 सामन्यात 63.00 च्या सरासरीने आणि 100.80 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 10 षटकार मारले.

राजवर्धन हैंगरगेकरसाठी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते, पण चेन्नई सुपर किंग्जने त्याला दीड कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केले.

IPL 2022 च्या लिलाव यादीत भारताच्या U-19 विश्वचषक विजेत्या संघातील आठ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये कॅप्टन यश धुल, हरनूर सिंग, अनिश्वर गौतम, राज अंगद बावा, कौशल तांबे, राजधरवन हंगरगेकर, वासू वत्स आणि विकी ओस्तवाल यांचा समावेश आहे.


हेही वाचा : IPL auction 2022 : मुंबई इंडियन्सची इशान किशनवर रेकॉर्डब्रेक बोली, तब्बल मोजले १५.२५कोटी