खेळपट्टी आणि मैदान तयार करणाऱ्या क्यूरेटर्सना बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर

दरवर्षी भारतात (India) एका उत्सवाप्रमाणेच इंडियन प्रिमीयर लीगचे (Indian Premier League) आयोजन केले जाते. मोठ्या दिमाखात ही आयपीएल खेळवली जाते. जगभरातील इतर देशांचे क्रिकेटपटू (Cricketer) या स्पर्धेत सहभाग घेतात.

दरवर्षी भारतात (India) एका उत्सवाप्रमाणेच इंडियन प्रिमीयर लीगचे (Indian Premier League) आयोजन केले जाते. मोठ्या दिमाखात ही आयपीएल खेळवली जाते. जगभरातील इतर देशांचे क्रिकेटपटू (Cricketer) या स्पर्धेत सहभाग घेतात. विशेष म्हणजे या आयपीएलमुळे (IPL) देशातील अनेक युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि भारतीय संघात पदार्पणाची संधीही उपलब्ध होते. मात्र, आयपीएलचे नाव काढले की सर्वत्र चर्चा रंगते ती संघ आणि खेळाडूंची. परंतु, ही आयपीएल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि खेळाडूंना सामना खेळतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नेहमीच सक्रीय असणारे क्यूरेटर्सची चर्चा अथवा दखल कोणीच घेत नाही. परंतु, यंदा बीसीसीआयने या सर्व क्यूरेटर्सच्या कामाची दखल घेत त्यांच्यासाठी पारितोषिकही जाहीर केले आहे. यांच्यासाठी बीसीसीआयकडून 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

6 ठिकाणांवरील क्यूरेटर्ससाठी बक्षीस जाहीर

यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वातील 74 सामन्यांसाठी खेळपट्टी आणि मैदान उत्तमरित्या तयार करणाऱ्या क्यूरेटर्सना बीसीआयकडून 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएल स्पर्धा संपल्याच्या एक दिवसानंतर 30 मे रोजी सामन्याच्या सर्व 6 ठिकाणांवरील क्यूरेटर्ससाठी हे बक्षीस जाहीर केले आहे. जय शाह यांनी ट्विट करत क्यूरेटर्सना सलाम करत याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – IPL 2022 award winners List : गुजरातने कमावले २० कोटी, तर जोस बटलर ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता खेळाडू

“ज्या लोकांनी आम्हाला आयपीएल 2022 मध्ये सर्वात चांगल्या मॅच दिल्या, त्यांच्यासाठी सव्वा कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आमचे पडद्यामागील हिरो सर्व 6 आयपीएल व्येनूचे क्यूरेटर आणि मैदानावरील कर्मचारी. आम्ही अनेक रंगतदार सामने पाहिले, प्रत्येकाच्या मेहनतीबद्दल आम्हाला सर्वांचे आभार मानायचे आहेत. CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया – ब्रेबॉर्न स्टेडियम), वानखेडे, डीव्हीआय पाटील आणि एमसीए पुणेसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये. तर ईडन गार्डन आणि नरेंद्र मोदी स्टेडियमसाठी प्रत्येकी साडे बारा लाख रुपये”, असे जय शाहा यांनी म्हटले.

हेही वाचा – ‘शेन वॉनला खूप मिस करतोय…’, शतकी खेळीनंतर जोस बटलर भावूक

दोन वर्षे आयपीएल स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये

दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर इंडियन प्रीमियन लीगचा (Indian premier league) संपूर्ण हंगाम भारतात आयोजित करण्यात आलाय. 26 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल 2022 (IPL 2022) ची फायनल एका जबरदस्त अंदाजात झाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आयपीएल स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. मागील वर्षी बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) भारतात आयपीएलचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मध्येच स्पर्धा रोखण्यात आली. यंदा मात्र बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भारतात यशस्वीरित्या पार पाडली आहे. या स्पर्धेतील मॅच मुंबईतील 3 मैदान, पुणे, अहमदाबाद आणि कोलकातामध्ये भरवण्यात आल्या.

सर्वाधिक 70 सामने हे मुंबई

आयपीएल 2022 च्या यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 70 सामने हे मुंबई आणि पुण्यातील 4 मैदानांवर खेळवण्यात आले. मुंबईत वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवण्यात आले. यात सर्वाधिक 20-20 सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर झाले. तसेच, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने खेळवण्यात आले. तसेच, प्लेऑफचे दोन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर तर अंतिम सामन्यासह शेवटचे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले.


हेही वाचा – IPL Winners List: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दोन मोठे यशस्वी संघ, जाणून घ्या कोणी आणि किती वेळा जिंकली ट्रॉफी