मुंबई इंडियन्सच्या संघात बदल, दुखापतग्रस्त सूर्यकुमारच्या जागी आकाश मडवलला संधी

आयपीएलच्या 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सला सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सततच्या पराभवामुळे मुंबईला यंदा आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारता आलेली नाही.

आयपीएलच्या 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सला सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सततच्या पराभवामुळे मुंबईला यंदा आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारता आलेली नाही. एकीकडे खराब कामगिरी तर दुसरीकडे दखापतीचे ग्रहण मुंबईच्या संघाला लागलंय. मुंबईचे आतापर्यंत दोन खेळाडून दुखापतग्रस्त झाले आहेत. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स आणि फलंदाज सुर्यकुमार यादव या दोन खेळाडूंना दुखापतीमुले आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे.

सुरूवातील टायमल मिल्स संघाबाहेर गेला होता. मिल्सच्या जागी मुंबईच्या संघात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची एंट्री झाली होती. त्यानंतर आता सुर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. त्याच्याजागी संगात आकाश मडवलचा समावेश करण्यात आला आहे. आकाश हा एक वेगवान गोलंदाज आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेकडून तो राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत असतो. आकाशने राष्ट्रीय स्तरावर २०१९ साली पदार्पण केले होते. आकाशची दमदार गोलंदाजी पाहून त्याला आयपीएलचा हंगाम सुरु होण्यापूर्वी शिबीरामध्ये संधी देण्यात आली होती. या शिबीरात आकाशने दमदार कामगिरी केली होती.

सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला होता. कारण तो चांगल्या फॉर्मात होता आणि मुंबईच्या संघाचा तो हुकमी एक्का होता. पण आता दुखापतीमुळे तो आयपीएलमधील यावर्षी एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे आता उर्वरीत सामन्यांमध्ये आकाश हा मुंबईच्या संघातून खेळताना दिसू शकतो. मुंबईचे या पर्वातील आव्हान सर्वप्रथम संपुष्टात आले आहे. पण आता पुढच्या पर्वासाठी त्यांची संघ बांधणी सुरु झाली आहे. त्यामुळेच या पर्वात आता मुंबईचा संघ वेगवेगळे प्रयोग करून पाहत आहे.


हेही वाचा – Women T-20 Challenge 2022 : महिला टी-20 चॅलेंजसाठी बीसीसीआयने केली सर्व संघांची घोषणा