घर क्रीडा IPL 2022 : ब्रायन लारा-डेल स्टेन सनरायझर्स हैदराबादमध्ये; मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2022 : ब्रायन लारा-डेल स्टेन सनरायझर्स हैदराबादमध्ये; मिळाली मोठी जबाबदारी

Subscribe

वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज राहिलेला डेल स्टेन हे इंडीयन प्रीमियर लीगशी जोडले गेले आहेत

वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज राहिलेला डेल स्टेन हे इंडीयन प्रीमियर लीगशी (IPL) जोडले गेले आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ब्रायन लाराला फलंदाजीचा तर स्टेनला गोलंदाजीचा प्रशिक्षक बनवले आहे. दरम्यान टॉम मूडी हैदराबादच्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक असतील. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करणारा एकमात्र फलंदाज लाराला फँचायझीने त्याला संघाचा धोरणात्मक सल्लागार देखील बनवले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज सिमोन कॅटिच सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडेल. यासोबत भारताचा माजी क्रिकेटर हेमांग बदानीकडे फिल्डिंग प्रशिक्षक आणि स्काउटची अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, हैदराबादच्या फँचायझीसोबत यापूर्वी मुथैया मुरलीधरन सारख्या दिग्गज माजी खेळाडूचा समावेश होता. मुथैया फिरकी गोलंदाजी आणि संघाची धोरणात्मक जबाबदारी सांभाळत होते. ब्रायन लाराने वेस्टइंडीजसाठी १३३ कसोटी, २९९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ११९५३ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९ शतकांच्या मदतीने १०४०५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण ५३ शतके आणि २२३५८ धावा आहेत. लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५०१ धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत मोठ्या खेळी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला लारा हा आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ९ द्विशतके आहेत. यात दोन त्रिशतके आहेत. लाराने १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७५ आणि २००४ मध्ये ४०० धावांची विक्रमी खेळी केली होती.

- Advertisement -

तर वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ बळी पटकावले आहेत. त्याने ९३ कसोटी सामन्यांत ४३५, १२५ एकदिवसीय सामन्यांत १९६ आणि ४३ टी-२० सामन्यांत ६४ बळी घेतले आहेत. स्टेनच्या नावावार दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्टेनच्या नावावर २३४३ दिवस अव्वल स्थानावर राहण्याचा विश्वविक्रम आहे.


- Advertisement -

हे ही वाचा: http://IPL 2022 Mega Auction : लिलावाच्या तारखा जाहीर; फेब्रुवारीमध्ये या दिवशी लागू शकते खेळाडूंची बोली


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -