IPL ‘या’ दोन बॉलसाठीही हवाय डीआरएस; डॅनियल व्हिटोरी, इम्रान ताहिरची मागणी

आयपीएलच्या 15व्या हंगामातील 47 वा सामना कोलकाता नाईट राडयर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकात्याच्या डावातील 19 व्या षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पंचांशी हुज्जत घालताना दिसला.

आयपीएलच्या 15व्या हंगामातील 47 वा सामना कोलकाता नाईट राडयर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकात्याच्या डावातील 19 व्या षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पंचांशी हुज्जत घालताना दिसला. गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं टाकलेला चेंडू वाईड नसतानाही पंचानी वाईड दिला. त्यानंतर लगेच संजू सॅमसनने डीआरएचची मागणी केली. यावर आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाज इम्रान ताहिर यांनी मोठी मागणी केली आहे.

कोलकात्याच्या डावातील 18 व्या षटकात राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात कोलकाताचे नितीश राणा आणि रिंकू सिंह हे दोन्ही डावखुरे फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन फलंदाजी करत होते. त्यामुळे प्रसिद्ध उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करत होता आणि मैदानातील पंच ते चेंडू वाईड ठरवत होते. दरम्यान, या षटकात पंचांनी पहिल्यांदा वाईड दिल्यानंतर संजू सॅमसन शांत होता. परंतु, जेव्हा फलंदाज वाईडच्या रेषेबाहेर जाऊन फलंदाजी करत होता आणि पंचानी पुन्हा वाईड दिला तेव्हा संजू चांगलाच भडकला.

या संपुर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र आता संजू सॅमसन आणि पंच यांच्या वादानंतर “सामन्यादरम्यान पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं संघाला अनेकदा मोठा फटका बसल्याचं आपण पाहिलं आहे. अशा चुकांना टाळण्यासाठी डीआरएसचा नियम बनवण्यात आला. आयसीसी 22.4.1 नियमानुसार, ज्या चेंडूवर फलंदाज शॉट मारू शकतो, त्याला पंच वाईट ठरवू शकत नाही. जर फलंदाज हालचाल करतोय आणि वाईट रेषेबाहेर जावून चेंडू खेळतोय. तसेच त्यावेळी फलंदाजाच बॅटनं चेंड मारू शकतो तर, त्याला वाईड घोषित केलं जात नाही. यामुळं वाईड बॉल आणि हाईट नो-बॉलसाठी डीआरएसचा पर्याय हवा.”, असं डॅनियल व्हिटोरी म्हणाला.

“गोलंदाजाच्या हितासाठी नियम फार कमी आहेत. जेव्हा फलंदाज तुम्हाला सर्व मार्गाने फटके मारत असतात, तेव्हा तुमच्याकडे वाइड यॉर्कर टाकणे किंवा वाइड लेग ब्रेक टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कोलकाता आणि राजस्थान यांच्यात पंचांनी दिलेल्या वाईड खूप जवळचा होता. ज्यामुळं सॅमसन निराश झाला. मला वाटत नाही की हा फार मोठा मुद्दा असावा. या सामन्यात कोलकात्याचा संघ ज्या प्रकारे खेळत होता, ते पाहून ते जिंकणारच होते. परंतु, वाईड बॉलबाबत डीआरएस घेण्याच्या पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे.”, असं इम्रान ताहिर यांनी म्हटले.


हेही वाचा – सामना सुरू होण्याआधीच पंजाब किंग्ज बॅकफुटवर जाण्याची शक्यता, गुजरात टायटन्सचं प्लेऑफवर लक्ष