आयपीएलकडून अंतिम सामन्याच्या वेळेत बदल, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

आयपीएलचे १५ वे हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी याआधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर उरलेल्या संघांमध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. परंतु असं असतानादेखील बीसीसीआयने अंतिम सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

येत्या २९ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. याआधी या सामन्याची सुरुवात सायंकाळी ७.३० वाजता होणार होता. तर ७ वाजता नाणेफेक होणार होती. मात्र आता बीसीसीआयने या सामन्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला असून सामना ७.३० ऐवजी अर्धा तसा उशिराने म्हणजेच ८ वाजता सुरु होण्याची शक्यता आहे. तर नाणेफेक ७.३० वाजता केली जाऊ शकते.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा उद्घाटन आणि समापन समारोह आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असणार आहे. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल.

दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे.


हेही वाचा : बुडाला औरांग्या पापी म्लेंछसंव्हार जाहाला..,पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा पोस्टर जारी