IPL 2022 : आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदाच लगावले 1 हजार षटकार, 4 वर्ष जुना विक्रम मोडीत

IPL 2022 first time 1 thousand sixes hit in IPL season breaking 4 year old record
IPL 2022 : आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदाच लगावले 1 हजार षटकार, 4 वर्ष जुना विक्रम मोडीत

आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामातील सर्व सामने पूर्ण झाले आहेत. मंगळवारपासून आता प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. आतापर्यंत जॉस बटलर आणि लियम लिविंगस्टोनसारख्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत फलंदाजी केली आहे. षटकारांची खेळी केली आहे. तर युजवेंद्र चहल आणि वानिंदू हसरंगासारख्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत अनेक विकेट आपल्या पारड्यात पाडले आहेत. या हंगामात आयपीएल 2022 कोणत्याही एका हंगामात सर्वाधिक षटकार मारल्याचा विक्रम मोडित काढला आहे. या हंगामात 1 हजार पेक्षा जास्त षटकार मारण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे की, एका हंगामात 1 हजार पेक्षा जास्त षटकारांची नोंद झाली आहे. यंदा गोलंदाजांनी 70 सामन्यात 1001 षटकार मारण्यात आले आहेत.

आयपीएल 2018 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्यात आले आहेत. त्या हंगामात 60 सामन्यात 872 षटकार मारण्यात आले आहेत. आयपीएल 2022 मध्ये हा रिकॉर्ड मोडित काढण्यात आला आहे. 15 मे रोजी 62 सामन्यादरम्यानच हा रिकॉर्ड मोडित निघाला आहे. तर 70 व्या सामन्यात एक हजार षटकार पूर्ण झाले. जर हे दोन हंगाम सोडले तर इतर कोणत्याही हंगामात 800 पेक्षा जास्त षटकार मारण्यात आले नाहीत. आयपीएल 2019 मध्ये 784 षटकार मारण्यात आले आहेत. जो सर्वाधिक षटकारांचा तिसरा रिकॉर्ड आहे. तर सर्वाधिक कमी 506 षटकारांचा विक्रम 2009 मध्ये करण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार बटलरच्या नावे

इंग्लंडचा खेळाडू जॉस बटलरने यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारले आहेत. बटलरने 14 सामन्यात 37 षटकार मारले आहेत. तर लियाम लिव्हिंगस्टोनने 34 षटकार ठोकले आहेत. तिसऱ्या स्थानी आंद्रे रसेल 32 षटकारांसह आहे. तर चौथ्या स्थानी 25 षटकारांसह भारताचा खेळाडू के एल राहूल आणि पाचव्या स्थानी रोव्हमन पॉवेल 22 षटकारांसह आहे. सर्व सामने झाल्यामुळे आता रसेल, लिव्हिंगस्टोन आणि पॉवेल यांना खेळण्यासाठी सामने नाहीत. यामुळे बटलरच्या नावे सर्वाधिक षटकारांचा विक्रम राहण्याची दाट शक्यता आहे.


हेही वाचा : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया घोषणा