IPL 2022 : या संघासोबत जोडले जाऊ शकतात गॅरी कर्स्टन; नेहरालाही मिळणार मोठी जबाबदारी

गॅरी कर्स्टन यांचे नाव जगभरातील सर्वात प्रभावशाली प्रशिक्षकांमध्ये घेतले जाते

गॅरी कर्स्टन यांचे नाव जगभरातील सर्वात प्रभावशाली प्रशिक्षकांमध्ये घेतले जाते. दरम्यान ते पुन्हा एकदा आयपीएल फ्रँचायझीच्या स्टाफचा हिस्सा होण्याची संभावना आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा माजी दिग्गज फलंदाज दिल्ली डेयरडेविल्स म्हणजेच सध्याच्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा प्रमुख प्रशिक्षक राहिला आहे. माहितीनुसार, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचे नाव अहमदाबाद संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहे आणि असेच काहीसे भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराच्या बाबतीत आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे दोन्हीही खेळाडू बंगळुरूच्या कोचिंच स्टाफचा हिस्सा राहिले आहेत.

दरम्यान, गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारताने जेव्हा २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकला होता, तेव्हा आशिष नेहरा त्या संघाचा सदस्य होता. अशातच इंग्लंडचा माजी खेळाडू विक्रमी सोलंकी याचा देखील कोचिंग स्टाफमध्ये समावेश होऊ शकतो. यापूर्वी सीव्हीसीच्या मालकीची अहमदाबाद फ्रँचायझी भारतीय प्रशिक्षकांशीही बोलणी करत होती. यामध्ये रवी शास्त्री, भरत अरूण आणि आर श्रीधर यांचा समावेश आहे.

अहमदाबाद फ्रँचायझीच्या कोचिंच स्टाफबाबत अंतिम निर्णय सीव्हीसी कॅपिटल्सला बीसीसीआयकडून मंजूरी मिळाल्यानंतरच घेण्याची आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्यासाठी जास्त वेळ लागणार नसल्याची संभावना आहे. कारण सीव्हीसी कॅपिटल्सला बोर्डाकडून सकारात्मक संकेताची अपेक्षा आहे. त्यांनी त्याच्या आशियाई फंडातून आयपीएलमध्ये गुंतवणूक केली आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला हे सांगण्यात आले होते.

बीसीसीआय अहमदाबाद फ्रँचायझीबाबत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट करण्यास तयार आहे, तर सध्या सगळे काही पक्के झाले आहे आणि फ्रँचायझीची या करारावर स्वाक्षरी होण्याची प्रतीक्षा आहे. यानुसार नवीन संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयार असतील.


हे ही वाचा: http://IPL 2022 Mega Auction : IPL च्या लिलावापूर्वी CSK चे रणनिती; या खेळाडूवर लावणार सर्वाधिक बोली