घरक्रीडाIPL 2022: "हार्दिक पांड्या नाव घेतल्यावर बातमी पण विकली जाते''; हार्दिक पांड्याचे...

IPL 2022: “हार्दिक पांड्या नाव घेतल्यावर बातमी पण विकली जाते”; हार्दिक पांड्याचे टीकाकारांना उत्तर

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीग (Indian Premier League) आयपीएलच्या 15 व्या पर्वाच्या अंतिम फेरीत यंदाच्या आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titan's) प्रवेश केला आहे. गुजरातने नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली प्ले ऑफमधील क्वॉलिफायरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव केला.

इंडियन प्रिमीयर लीग (Indian Premier League) आयपीएलच्या 15 व्या पर्वाच्या अंतिम फेरीत यंदाच्या आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titan’s) प्रवेश केला आहे. गुजरातने नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली प्ले ऑफमधील क्वॉलिफायरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव केला. मात्र, हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्ती आणि क्षमतेवर अजुनही टीका केली जात आहे. यावर आता हार्दिकने “हार्दिक पांड्याचं नाव घेतलं की न्यूज पण विकली जाते”, अशा शब्दांत सडेतोड उत्तर दिले आहे.

“लोकांचे कामच ते आहे, मी काय करू सर?; हार्दिक पांड्याचे नाव घेतलं की न्यूज पण विकली जाते. मला काहीच समस्या नाही. मी हसून सोडून देतो.”, अशा शब्दांत हार्दिकने टीकाकारांना सुनावले.

- Advertisement -

2021च्या टी-20 नंतर हार्दिक पांड्याकडे गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले. दुखापतीतून परतल्यानंतर तो स्वत:च्या कामगिरीने संघाला कसा पुढे नेईल, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण त्याने आपल्या कर्णधारपदाने आणि फलंदाजीने सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. तसेच, दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

हार्दिकने यंदाच्या पर्वात 45 च्या सरासरीने 453 धावा केल्या आणि 7.73 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली. त्याशिवाय, गुजरात टायटन्सने यंदाच्या पर्वात तिसऱ्यांदा १८०+ धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब (2014), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2017), चेन्नई सुपर किंग्स (2018), कोलकाता नाईट रायडर्स (2019) व राजस्थान रॉयल्स (2020) यांनी अशी कामगिरी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Gujarat Titans IPL 2022: राजस्थानवर मात करत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, संघाकडून नवा रेकॉर्ड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -