IPL 2022 : मॅथ्यू वेडवर आयपीएलची ‘ही’ कारवाई; ड्रेसिंगरुममध्ये आदळाआपट करणे पडले महागात

इंडियन प्रिमीयर लीगमधील (IPL 2022) 67 वा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात झाला. या सामन्यात पंचांनी बाद घोषित केल्यावर गुजरातचा फलंदाज मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आदळआपट केली.

इंडियन प्रिमीयर लीगमधील (IPL 2022) 67 वा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात झाला. या सामन्यात पंचांनी बाद घोषित केल्यावर गुजरातचा फलंदाज मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आदळआपट केली. त्यामुळे आता ही आदळाआपट करणे मॅथ्यू वेडला चांगलेच महागात पडले आहे. आयपीएलने (Indian Premier League 2022) त्याला कोड ऑफ कन्डक्ट (code of conduct) अतंर्गत दोषी ठरवलं. त्याला लेव्हल एकच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं आहे.

गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल 21 धावा झालेल्या असताना झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेड (Matthew Wade) आक्रमकपणे खेळत होता. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) चेंडूवर १६ धावांवर असताना तो पायचित झाला. बंगळुरुच्या खेळाडूंनी अपिल केल्यानंतर त्याला पंचाने बाद दिले. त्यानंतर लगेच आक्षेप घेत मॅथ्यू वेडने डीआरएस घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये तो पायचित झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला बाद म्हणून जाहीर केले गेले.

हेही वाचा – आयपीएलकडून अंतिम सामन्याच्या वेळेत बदल, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

पंचाच्या या निर्णयावर मॅथ्यू वेड असमाधानी दिसला. त्याने मैदानातच पंचांच्या निर्णयाच्या विरोधात आरडोओरड केली. शिवाय, ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर आपला राग काढला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून दिले. खुर्चीवर जोरजोरात बॅट आदळली.

हेही वाचा – RCB vs GT: आयपीएलमध्ये ५७ धावांचा टप्पा आणि कोहलीचा विक्रम

यामुळेच आयपीएलने त्याला कोड ऑफ कन्डक्ट अतंर्गत दोषी ठरवलं. त्याला लेव्हल एकच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानेदेखील आपली चूक मान्य केली असून यावेळी त्याला समज देण्यात आही. अशीच चूक पुन्हा केली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

हेही वाचा – IPL 2022: एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेलची ‘आरसीबी’च्या Hall of Fame मध्ये निवड

या सामन्यात गुजरातने बंगळुरुसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठताना विराट कोहलीने चांगली खेळी केली. त्याने ७३ धावा केल्या. परिणामी बंगळुरु संघाला विजय सोपा झाला. बंगळुरु संघाने आठ गडी राखून गुजरातवर विजय मिळवला.


हेही वाचा – नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा सश्रम कारावास