घरक्रीडाIPL 2022 : ही नवी अध्यायाची सुरुवात, मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाल्यानंतर जोफ्रा...

IPL 2022 : ही नवी अध्यायाची सुरुवात, मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाल्यानंतर जोफ्रा आर्चरची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई इंडियन्सचे क्रिकेट मार्गदर्शक आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान म्हणाला की, बुमराह आणि आर्चरला सोबत खेळताना पाहणे रोमांचक होईल. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा याची वाट पाहतो आहे. यावेळी दोन उत्कृष्ट गोलंदाज एकत्र गोलंदाजी करताना दिसतील.

आयपीएल 2022 मध्ये मेगा लिलाव शनिवारी आणि रविवारी पार पडला आहे. या लिलावात अनेक खेळाडू करोडपती झाले आहेत. मुंबई इंडियन्सने दिग्गज आणि नव्या खेळाडूंनासुद्धा संघात स्थान दिलं आहे. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असूनही त्याला मुंबईच्या संघाने कोट्यावधी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. संघात सहभागी झाल्यानंतर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आनंद व्यक्त केला आहे. ही नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचे जोफ्रा आर्चर म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवर जोफ्रा आर्चरची एक व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे. त्याला मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने लिलावाच्या दुसऱ्या दिवशी खरेदी केले आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापत झाल्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळू शकत नाही. मात्र त्याला मुंबई इंडियन्सने तब्बल ८ करोड रुपयांना खरेदी केले आहे. हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर यंदा खेळू शकत नाही. परंतु त्याला 2023 आणि 2024 हंगामातील आयपीएल लक्षात ठेवून लिलावात सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

- Advertisement -

जोफ्रा आर्चरचा मुंबई इंडियन्सच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जोफ्रा आर्चर म्हणाला आहे की, मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होऊन आनंद झाला. हा संघा माझ्या अगदी मनाजवळ असून या संघात खेळण्याची इच्छा होती. जेव्हापासून आयपीएल पाहतो आहे अगदी तेव्हापासून खेळण्याची इच्छा होती. मला आनंद आहे की, एवढ्या चांगल्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. जगातील सगळ्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल आणि माझ्या कारकिर्दीसाठी हा नवीन अध्याय असेल असे जोफ्रा आर्चर म्हणाला आहे.

यापूर्वी जोफ्रा आर्चरला खरेदी करण्यासंदर्भात मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी म्हणाले होते की, तो यंदाच्या हंगामात खेळू शकत नाही. परंतु तो तंदुरुस्त असेल तर जसप्रीत बुमराहसोबत चांगली जोडी करु शकतो. मुंबई इंडियन्सचे क्रिकेट मार्गदर्शक आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान म्हणाला की, बुमराह आणि आर्चरला सोबत खेळताना पाहणे रोमांचक होईल. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा याची वाट पाहतो आहे. यावेळी दोन उत्कृष्ट गोलंदाज एकत्र गोलंदाजी करताना दिसतील.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 Mega Auction : आयपीएल लिलावात सुरेश रैना UNSOLD, चेन्नईच्या संघाचा आला मॅसेज

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -