आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव भारतातच होणार आहे. दरम्यान मेगा लिलावाच्या आधी ४ वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईच्या फँचायझीने एम.एस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली या ४ खेळाडूंना रिटेन केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे या संघाला चॅम्पियन बनवण्यात कित्येक खेळाडूंचा मोठा हात राहिला आहे. मात्र रिटेंशन पध्दतीच्या नियमांमुळे सीएसकेची फँचायझी सर्व खेळाडूंना रिटेन करू शकली नाही. मात्र मेगा लिलावाच्या आधीच सीएसकेने खुलासा केला आहे की ते मेगा लिलावात ते कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावणार आहेत.
या खेळाडूचे सीएसकेत होऊ शकते पुनरागमन
आयपीएलच्या फ्रँचायझींना ऑक्शनच्यापूर्वी जास्तीत जास्त ४ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली होती. अशातच सर्वात मोठा सामनावीर म्हणून ओळख असलेल्या फाफ डु प्लेसिसला देखील या संघाने रिलीज केले आहे. फाफ डु प्लेसिसने सीएसकेसाठी किताब जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे सीएसकेची फँचायझी फाफ डु प्लेसिसवर सर्वाधिक बोली लावण्याची शक्यता आहे.
सीएसकेने नुकतीच एक व्हिडीओ पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी फाफ डु प्लेसिसला संघात घेण्याचे संकेत दिले होते. त्यांनी प्लेसिसच्या शानदार खेळींना उजाळा देखील दिला होता. त्यामुळे आमचे कर्तव्य आहे की त्याला संघात परत आणण्यासाठी प्रयत्न करणे, आम्ही आगामी लिलावात यासाठी पूर्पणे प्रयत्न करणार आहोत. असे विश्वनाथ यांनी म्हटले.
कधी होणार आयपीएलचा मेगा लिलाव?
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाच्या तारखांची घोषणा झाली आहे. हा मेगा लिलाव ७-८ फेब्रुवारीमध्ये बंगळुरूत होणार आहे.
हे ही वाचा: http://IND vs SA : पुजाराला आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा विश्वास; म्हणाला, मागच्या दौऱ्याचा फायदा होणार