Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2022: आयपीएल स्पर्धेत दुबळेपणाला स्थान नाही; पराभवानंतर गौतम गंभीरने खेळाडूंना झापलं

IPL 2022: आयपीएल स्पर्धेत दुबळेपणाला स्थान नाही; पराभवानंतर गौतम गंभीरने खेळाडूंना झापलं

Subscribe

गुजरात टायटन्सनं 62 धावांनी लखनऊ सुपर जायंट्सला पराभुत केलं. तसंच, आयपीएल 2022 प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. मात्र या पराभवानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीर खेळाडूंवर चांगलाच भडकला

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्य पर्वातील 57 वा सामाना मंगळवारी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं 62 धावांनी लखनऊ सुपर जायंट्सला पराभुत केलं. तसंच, आयपीएल 2022 प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. मात्र या पराभवानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीर खेळाडूंवर चांगलाच भडकला. ‘हरण्यात काही नुकसान नाही, पण पराभव स्वीकारणं अत्यंत चुकीचे आहे’, अशा शब्दांत गौतम गंभीरने लखनूच्या खेळाडूंना झापलं. त्यांच्या यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, या पोस्टमध्ये गंभीर सामन्यानंतर खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. “सामन्यामध्ये हार-जीत होत असते. एक टीम जिंकणार, दुसरी हरणार. पण पराभव स्वीकारणं, पूर्णपणे चुकीच आहे. मला वाटतं आज आपण लढलोच नाही. या सामन्यात सर्व खेळाडू वीक दिसत होते. आयपीएल सारख्या स्पर्धेत दुबळेपणाला स्थान नाही. गुजरातकडं जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. पण तुम्ही आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध खेळत आहात आणि संघांनी आपल्याला आव्हान द्यावे अशी आमची इच्छा आहे. आपल्याला आव्हानांचा सामना करायचा आहे आणि म्हणूनच आपण सराव करतो”, असं गौतम गंभीर यांनी म्हटलं.

- Advertisement -

गुजरातच्या संघानं दिलेल्या 145 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊचा संघ 13.5 षटकांत 82 धावांवर आटोपला. लखनऊच्या संघाकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 27 धावा केल्या. त्यानं 26 चेंडूत तीन चौकार मारले. तसंच, कर्णधार केएल राहुल 8 धावा करून माघारी परतला. क्विंटन डी कॉकला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तोही 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव पुढे घेऊन जाता आला नाही.

आयपीएल 2022 प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. लखनौच्या संघाचे सध्या 16 गुण असून त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. परंतु, गुजरातविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर लखनौचा मेंटर गौतम गंभीर खेळाडूंवर चांगलाच भडकला.


- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : बरगडीला दुखापत; रवींद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -