घरक्रीडाIPL 2022: गब्बर धवनची तुफानी खेळी; एकाच सामन्यात रचले 2 विक्रम

IPL 2022: गब्बर धवनची तुफानी खेळी; एकाच सामन्यात रचले 2 विक्रम

Subscribe

भारतीय संघाचा सलामीवीर आणि आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाचा खेळाडू शिखर धवन याने नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15व्या पर्वात 38 व्या सामन्यात चेन्नई आणि पंजाब यांच्यात खेळवला गेला.

भारतीय संघाचा सलामीवीर आणि आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाचा खेळाडू शिखर धवन याने नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15व्या पर्वात 38 व्या सामन्यात चेन्नई आणि पंजाब यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पंजाबची गब्बर खेळाडू शिखर धनवनने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने नाबाद 88 धावा करत या सामन्यात दोन नवे विक्रम रचले आहेत.

या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शिखर धवनने मैदानात येताच जोरदार फटकेबाजी केली. धवनने फलंदाजीवेळी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धवनच्याच फलंदाजीमुळे पंजाबला 187 धावसंख्येपर्यंत मजल मारत आली. त्याने 59 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि दोन षटकार लगावत 88 धावा केल्या. ही धावसंख्या उभारताना त्याने दोन मोठे विक्रम नोंदवले आहेत.

- Advertisement -

शिखर धवनचा आयपीएलमधील हा 200 वा सामना होता. मैदानात उतरताच तो २०० आयपीएल सामने खेळणारा आठवा खेळाडू ठरला. यामध्ये धोनी प्रथम क्रमांकावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 228 सामने खेळले आहेत. तसेच या विक्रमासोबतच धवननने आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 6 हजार धावांपर्यंत मजल मारणारा धवन दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या नावावर 6402 धावा असून तो प्रथम क्रमांकावर आहे. रोहित शर्मा तिसऱ्या तर डेव्हिड वॉर्नर चौथ्या स्थानावर आहे.

या सामन्यात पंजाब किंग्जचा ११ धावांनी विजय झाला असून चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागलाय. अंबाती रायडूने शेवटपर्यंत संघर्ष करुनही चेन्नईला विजयापर्यंत पोहोचता आलं नाही. तर पंजाबचे शिखर धवन आणि ऋषी धवन या जोडीने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Irfan Pathan On Dhoni: डिव्हिलियर्स नाही तर हा खेळाडू आहे महान फिनिशर, इरफान पठाणचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -