घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलमधील दिल्ली वि. पंजाबचा सामना होणार निर्णायक, कोणाच्याही विजयामुळे...

IPL 2022 : आयपीएलमधील दिल्ली वि. पंजाबचा सामना होणार निर्णायक, कोणाच्याही विजयामुळे बंगळुरूचं टेन्शन वाढणार

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयरीएल) 15 व्या पर्वाचा शेवट आता जवळ आला आहे. यंदाच्या आयपीएलचा हा शेवटचा आठवडा असून आता केवळ 7 लीग मॅच बाकी असून 'प्ले ऑफ' मधील 3 जागा अद्याप अनिश्चित आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयरीएल) 15 व्या पर्वाचा शेवट आता जवळ आला आहे. यंदाच्या आयपीएलचा हा शेवटचा आठवडा असून आता केवळ 7 साखळी सामने बाकी आहेत. तसंच, ‘प्ले ऑफ’ मधील 3 जागा अनिश्चित आहेत. दरम्यान, आयपीएलचा आजचा सामना महत्वाचा असणार आहे. आयपीएल प्ले ऑफसाठी एक महत्त्वाची लढत सोमवार दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे.

आतापर्यंत दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघाने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. रनरेटच्या आधारावर दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघाना ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याची संधी असून त्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे.

- Advertisement -

जी टीम उर्वरित दोन्ही सामने जिंकेल त्यांचे 16 पॉईंट्स होणार असून त्यांना ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करता येणार आहे. आज दिल्ली आणि पंजाब यांच्यात होणारा सामना निर्णायक असणार आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाब या लढतीमध्ये कुणीही जिंकलं तरी त्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढणार आहे. आरसीबी सध्या 14 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

पण, त्यांचा रनरेट मायनेस आहे. त्यामुळे दिल्ली किंवा पंजाब यांच्यात जिंकणाऱ्या टीमची शेवटच्या जागेसाठी आरसीबीशी लढत होणार आहे. आरसीबीला आता गुजरात टायटन्स विरूद्ध होणारा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं बंधनकारक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारताने रचला इतिहास, प्रथमच जिंकला थॉमस कप, 14 वेळा चॅम्पियन राहिलेल्या इंडोनेशियाचा पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -