तुफानी खेळीनंतर क्विंटन डी कॉकचे अफलातून क्षेत्ररक्षण; हवेत झेल घेत फलंदाजाला केले बाद

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने तुफानी फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने तुफानी फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह नाबाद १४० धावांची विक्रमी खेळी केली. एवढे डिकॉक दमला नाही तर, तो क्षेत्ररक्षणही अफलातून करताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीवेळी मोहसिन खानने टाकलेल्या पहिल्याच षटकात क्विंटनने अफलातून झेल घेतला. वेंकटेश अय्यरला भोपळा न फोडू देताच माघारी पाठवले.

लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक या जोडीने कोलकाताविरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या दोघांमुळे लखनऊने एकही विकेट न गमावता 20 षटकांत 210 धावां केल्या. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने 12 धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याचा फटका त्यांना बसला. क्विंटन व लोकेश यांनी संपूर्ण 20 षटके खेळून विक्रमांची नोंद केली. क्विंटन 70 चेंडूंत 10 चौकार व 10 षटकारांसह 140 धावांवर, तर लोकेश 51 चेंडूत 68 धावांवर नाबाद राहिला. लखनौने 210 धावा केल्या.


हेही वाचा – क्विंटन डी कॉक आणि लोकेश राहुलने रचला इतिहास; 20 षटकात केल्या ‘इतक्या’ धावा