घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलमुळं रातोरात बदललं खेळाडूचं नशीब, २०० रुपयांसाठी खेळायचा सामना...

IPL 2022 : आयपीएलमुळं रातोरात बदललं खेळाडूचं नशीब, २०० रुपयांसाठी खेळायचा सामना आता झालाय करोडोंचा मालक

Subscribe

भारताच्या देशांतर्गत सामन्यात आयपीएलचे २००८ मध्ये आगमन झाल्यानंतर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. प्रसिद्धीच्या झोतातून दूर आणि सामान्य जीवण जगणाऱ्या खेळाडूंच्या जीवनात बदल करण्याचे काम आयपीएलने केले आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात.

आयपीएलमध्ये येण्यापूर्वी जो खेळाडू २०० रुपयांसाठी सामना खेळत होता. तो आता करोडो रुपयांचा मालक आहे. नवदीप सैनी हा राजस्थान रॉयल्सच्या संघात आहे. गोलंदाज नवदीप वेगवान आणि घातक गोलंदाज मानला जातो. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या फ्रेंचायझीने नवदीपला खरेदी केले आहे. एकूण २.६ करोड रुपयांना नवदीप सैनिला खरेदी करण्यात आले आहे. लागोपाठ १४०-१५० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करणं नवदीपचे वैशिष्ट्ये आहे.

- Advertisement -

भारतातील देशांतर्गत क्रिकेट सामन्यात दिल्लीच्या संघासाठी खेळणारा सैनी हरियाणाच्या करनालचा आहे. एकेकाळी नवदीप देशांतर्गत सामन्यात खेळण्यासाठी २०० रुपये प्रति सामना घेत होता. ही मालिका लेदरच्या जागी टेनिस बॉलसह खेळण्यात येते होती.

गौतम गंभीरने केली होती मदत

नवदीप सैनीच्या क्रिकेट विश्वातील कारकिर्दीचे श्रेय भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरला जाते. करनाल प्रीमियर लीगदरम्यान माजी गोलंदाज सुनील नरवालने नवदीप सैनीला गोलंदाजी करताना पाहिले होते. यानंतर त्याने गौतम गंभीरला सैनीबाबत सांगितले होते. सैनीला सराव करण्यासाठी बोलवण्यात आले. सरावादरम्यान सैनीले आपल्या गोलंगाजीच्या वेगाने गंभीरला प्रभावित केले. यानंतर गौतम गंभीरने त्याला रोज सराव करण्यासाठी बोलवले. नवदीप सैनी भारतीय संघासाठी देखील खेळला आहे. भारतासाठी २ कसोटी , ८ एकदिवसीय आणि ११ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 मध्ये धोनीचा CSK नव्या अवतारात दिसणार, सलामीच्या सामन्यापूर्वी नवी जर्सी लाँच; पाहा व्हिडीओ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -