घरक्रीडाIPL 2022 : एका विधानामुळे रिद्धिमान साहाने मध्येच सोडला संघ, whatsapp ग्रुपमधून...

IPL 2022 : एका विधानामुळे रिद्धिमान साहाने मध्येच सोडला संघ, whatsapp ग्रुपमधून पडला बाहेर

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहाने बंगालसाठी रणजी करंडक नॉक आऊट सामना खेळण्यापासून नकार दिला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशन म्हणजेच CAB ने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. यासह साहाची बंगाल क्रिकेट संघातील देशांतर्गत कारकीर्द संपुष्टात आली. 2007 मध्ये त्याने बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बंगालचा झारखंडविरुद्ध रणजी ट्रॉफीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 6 जून रोजी होणार आहे.

साहाची बंगाल क्रिकेट संघातील देशांतर्गत कारकीर्द संपुष्टात आली. 2007 मध्ये त्याने बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. साहा सध्या आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. त्याच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या लीगचा अंतिम सामना या रविवारी अहमदाबादमध्ये होणार आहे. रणजी ट्रॉफीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बंगालचा झारखंडविरुद्ध 6 जून रोजी होणार आहे. यामध्ये साहा खेळणार नाही. साहा सध्या आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. त्याच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या लीगचा अंतिम सामना या रविवारी अहमदाबादमध्ये होणार आहे.

- Advertisement -

साहाने अशा महत्त्वाच्या प्रसंगी रणजी ट्रॉफीचा बाद फेरीचा सामना खेळावा आणि गट टप्प्यात अव्वल स्थान पटकावून विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करावा अशी CAB ची इच्छा होती. यष्टिरक्षक फलंदाजाने संघासोबत राहायला हवे होते. याबाबत मी साहा यांच्याशी बोललो आणि त्यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. मात्र, साहाने आम्हाला रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे सामने खेळायचे नसल्याचे सांगितले आहे. असे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी म्हटलं आहे.

साहाने बंगालकडून मागितली एनओसी

विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहाने 122 प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने पहिलेच राज्य क्रिकेट असोसिएशनला आंतरराज्य एनओसीसाठी विनंती केली आहे. या मुद्द्यावर सीएबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही काय करु शकतो, जर तो अशी आडमुठी भूमिका घेत असेल तर त्याला आम्ही एनओसी देऊ. पण, माझे म्हणणे आहे की कोणत्याही खेळाडूने राज्य क्रिकेट संघटनेशी मनमानी करू नये. कारण संघ कोणत्याही खेळाडूपेक्षा मोठा असतो.

- Advertisement -

साहाने बंगाल टीमचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला

मिळालेल्या माहितीनुसार साहाने बंगाल क्रिकेट टीमचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला आहे. साहाच्या निर्णयावर मी भाष्य करणार नाही, त्याने संघातून माघार घेण्याचा निर्णय का घेतला. मात्र, आता चित्र स्पष्ट झाले आहे. आता आम्ही त्यानुसार आमची रणनीती तयार करू शकतो असे अशा परिस्थितीत बंगाल संघाच्या कोचिंग स्टाफच्या एका सदस्याने सांगितले आहे.


हेही वाचा : आयपीएल 2023मध्ये पोलार्ड मुंबईच्या संघात नसणार?, भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणतो…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -