Viral video : पंजाबचा संघ प्ले ऑफमध्ये न गेल्याने धवनला वडिलांकडून मारहाण

यंदाच्या आयपीएलच्या 15 (IPL) व्या पर्वातील पंजाब किंग्ज (Panjab Kings) संघाचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला त्यांच्या वडिलांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.

यंदाच्या आयपीएलच्या 15 (IPL) व्या पर्वातील पंजाब किंग्ज (Panjab Kings) संघाचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला त्यांच्या वडिलांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये (IPL Play Off) दाखल न झाल्यामुळे शिखरला त्याच्या वडिलांनी (Shikar Dhawan dad) मारल्याचे समजते. पंजाब किंग्ज संघाचे आव्हान आयपीएल स्पर्धेच्या साखळी फेरीतच संपुष्टात आले. पंजाब आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL Point table) सहाव्या स्थानीच राहिला. दरम्यान, आयपीएलच्या साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर शिखरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शिखर धवनने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धवनचे वडिल त्याला मारत आहेत, आणि अन्य उपस्थित सहकारी त्यांना मारण्यास अडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शिखरने स्वत: तयार केला असून, ‘प्लेऑफमध्ये संघ न पोहचल्यामुळे वडिल नाराज झाले असून त्यांनी मारले’, असे कॅपशन त्याने दिले आहे. दरम्यान, शिखर धवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओला अल्पावधीतच चार लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तर कमेंट्सचा वर्षाव पडत आहे. चाहत्यांसोबतच क्रिकेटरनेही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2022: शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan sing) याने हस्यास्पद कमेंट केली आहे. ‘बापू तेरे से भी ऊपर का एक्टर निकले…क्या बात है’, असे त्याने लिहीले. शिखरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. शिखर धवन हा मैदानात फॉर्मात असतोच, मात्र मैदानाबाहेरही धवन नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

हेही वाचा – IPL 2022: गब्बर धवनची तुफानी खेळी; एकाच सामन्यात रचले 2 विक्रम

शिखर धवनने आयपीएलच्या यंदाच्या पर्वात 14 सामन्यांमध्ये 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या. मागील सात पर्वांमध्ये धवनने कायमच 450 हून अधिक धावा केल्या आहे. सध्या शिखर धवन हा पंजाब संघाचा कर्णधार नसला तरी फलंदाजीच्या माध्यमातून त्याने अनेकवेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असल्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची (Captain) माळ त्याच्यादेखील गळ्यात पडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर; अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा अव्वल स्थानी