घरक्रीडाIPL 2022 : पहिल्या सामन्यातच मुंबई इंडियन्स झटका, सूर्यकुमार यादव संघाबाहेर राहण्याची...

IPL 2022 : पहिल्या सामन्यातच मुंबई इंडियन्स झटका, सूर्यकुमार यादव संघाबाहेर राहण्याची शक्यता

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील सगळ्यात यशस्वी टीम मानले जाणाऱ्या मुंबई इंडियन्सला मालिका सुरु होण्यापूर्वीच मोठा झटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरोधात मुंबई पहिला सामना खेळणार आहे. परंतु या सामन्यामध्ये स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता कमी आहे. मुंबईने आयपीएल २०२२ पूर्वी सूर्यकुमार यादवला मोठी रक्कम देऊन रिटेन केले आहे. सध्या यादव दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव महत्त्वाचा खेळाडू आहे. यादवच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ अनेक सामने जिंकला आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतही चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये तो संघात राहिला नाही तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्समधील अव्वल दर्जाचा खेळाडू सूर्यकुमार यादव २७ मार्चला होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सूर्यकुमारच्या हाताच्या अंगठ्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून बरे होण्यासाठी सूर्यकुमार यादवला वेळ लागणार आहे. यामुळे तो पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

सूर्यकुमार यादव २ एप्रिल २०२२ रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणार असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सचे सगळे खेळाडू आता हॉटेलमध्ये एकत्र येत आहेत. श्रीलंकाविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह संघाशी जोडला गेला आहे. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाच्या बायो-बबलमधून मुंबई इंडियन्सच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे.


हेही वाचा : ICC Test Ranking : आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारताची पहिल्या स्थानी झेप, पण पाकिस्तानचा विजय महत्त्वाचा का?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -