IPL 2022 : आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात टॉपवर; मुंबई, चेन्नई आऊट

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद सर्वाधिक वेळा जिकलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ यंदा मात्र आयपीएलमधून बाहेर गेले आहेत.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद सर्वाधिक वेळा जिकलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ यंदा मात्र आयपीएलमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच पराभवाचा सामना करणाऱ्या ‘मुंबई’ने प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. त्यामुळे ‘मुंबई’नंतर आता ‘चेन्नई’ही आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर गेली आहे.

आयपीएलचा 15 व्या पर्वाचा आता उत्तरार्धा जवळ आला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रत्येक सामन्यात प्लेऑफसाठीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफचे तिकीट पक्के केले. इतर तीन जागांसाठी सात संघामध्ये चुरस सुरु आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई यांचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. चेन्नईचा हा आठवा पराभव होता. या पराभवासह चेन्नईचे प्लेऑफमधील उरले सुरले आव्हान संपुष्टात आलं आहे.

6 संघामध्ये तीन स्थानासाठी कडवी टक्कर होणार आहे. यामध्ये राहुलच्या नेतृत्वाती लखनौ 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊमध्ये प्लेऑफमध्ये पोहचण्याची जास्त शक्यता आहे. दोन स्थानासाठी पाच संघामध्ये लढत आहे. राजस्तान, आरसीबी या संघाचे प्रत्येकी 14 -14 गुण आहे. प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी या दोन्ही संघांना पुढील प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे.

दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद या संघानाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची समान संधी आहे. दिल्ली 12 गुणांसह पाचव्या क्रमांकवर आहे. दिल्लीचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. तर हैदराबाद आणि कोलकाता संघाचे प्रत्येक 10 गुण आहेत.


हेही वाचा – जागतिक शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत आर्यन करणार भारताचे नेतृत्व, स्पर्धा जिंकण्याचा दाट विश्वास