IPL 2022 : गुजरातसह ३ संघ प्लेऑफमध्ये पोहचतील, वसीम जाफरची भविष्यवाणी

IPL 2022 Wasim Jaffer 3 teams including Gujarat reach playoffs
IPL 2022 : गुजरातसह ३ संघ प्लेऑफमध्ये पोहचतील, वसीम जाफरची भविष्यवाणी

आयपीएल 2022 आता अंतिम टप्प्यात आहे. सीझन-15 मध्ये आतापर्यंत 60 सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामा गुजरात टायटन्स हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला आहे. त्याचवेळी 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि 4 वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. प्लेऑफच्या उर्वरित तीन स्थानांसाठी उर्वरित 7 संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे, अशा स्थितीत लीग टप्प्यातील शेवटच्या 10 सामन्यांमध्ये चाहत्यांना प्रचंड जल्लोष पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट तज्ज्ञ वसीम जाफरने प्लेऑफमधील उर्वरित तीन संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. वसीम जाफर म्हणतो की राजस्थान रॉयल्ससह गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील, तर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानासाठी लढतील. आरसीबी प्लेऑफमध्ये जाण्यास मुकणार असल्याची भविष्यवाणी जाफरने केली आहे.

राजस्थान रॉयल्सने दोनपैकी दोन सामने गमावले तर ते खूप निराशाजनक असेल. पण ते पात्र ठरतील असे मला वाटत नाही. पंजाब आणि दिल्ली पात्र होऊ शकतात. या दोन संघांपैकी एक संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचेल. मला वाटतं की आरसीबी संघ प्लेऑफमध्ये जाण्यापासून स्वतःच मार्ग बंद करेल यामुळे ते पात्र ठरणार नाहीत असे वसीम जाफर म्हणाला आहे.

आरसीबीला शुक्रवारी रात्री पंजाबकडून सामन्यात हार पत्कारावी लागली होती. या पराभवामुळे संघाचे दोन गुणांकाने नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या निव्वळ रनरेटवरही परिणाम झाला. आरसीबीचा पुढील सामना या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ गुजरात टायटन्सशी होणार आहे. बंगळुरूने हार्दिक पांड्याच्या संघाला हरवलं तर नेट रन रेटवर ही युक्ती अडकणार असल्याचे वसीम जाफर म्हणाला.


हेही वाचा : टी-20 विश्वचषकासीठी हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात हवाच – हरभजन सिंह