सामन्यादरम्यान धोनीने बॅट चावण्याचा अमित मिश्राने केला खुलासा; वाचा नेमक काय म्हणाला…

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचा बॅट चावतानाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचा बॅट चावतानाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनीचा हा फोटो पाहून धोनी आपली बॅट का चावतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याच्या या बॅट चावण्याचा धोनी सोबत अनेक सामने खेळलेल्या अमित मिश्राने हा खुलासा केला आहे.

“तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, धोनी आपली बॅट का चावतोय?, बॅटवर लावलेली टेप हटवण्य़ासाठी धोनी हे सर्व करतोय. तुम्हाला एकही धागा धोनीच्या बॅटवर मिळणार नाही” असं अमित मिश्राने सांगितलं.

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 91 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. धोनी याने या डावात छोटी 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनी याने 8 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. अखेरीस धोनीने केलेल्या फलंदाजीच्या बळावरच 208 धावा होऊ शकल्या. दिल्लीचा डाव फक्त 117 धावात आटोपला.

आयपीएल २०२२ मेगा लिलावात अमित मिश्राला एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याचवेळी आयपीएलच्या या मोसमात धोनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. आयपीएलचे हे पर्व सुरू होण्यापूर्वी धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते, मात्र संघाच्या खराब कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजाने पुन्हा सीएसकेचे कर्णधारपद धोनीकडे सोपवले. यासोबतच धोनी आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असणारा भारतीय खेळाडू ठरला.

चेन्नईने दिल्लीसमोर विजयासाठी २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पूर्ण गडी बाद होईपर्यंत दिल्लीला फक्त ११७ धावा करता आल्या. या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शर्यत आणखी कठीण होऊन बसली आहे.


हेही वाचा – रन मशीन झाली डक मशीन; आयपीएलमध्ये कोहलीची 10 वर्षातील सर्वात खराब सरासरी