घरक्रीडाIPL 2022 : पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आघाडीवर

IPL 2022 : पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आघाडीवर

Subscribe

आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वच समाने रोमांचक झाले असून या पुढच्या सामन्यातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऑरेंज आणि पर्पल कॅपमधील रश्शी खेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार युजवेद्र चहल परपल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आला आहे. युझवेंद्र चहल 11 सामन्यांत 22 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर वानिंदू हसरंगा (21) दुसऱ्या स्थानावर आहे. कागिसो रबाडा (18) क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर आहे, कुलदीप यादव (18) चौथ्या क्रमांकावर पर्पल कॅप शर्यतीत आहे. टी नटराजन 17 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

पर्पल कॅप म्हणजे उत्कृष्ठ गोलंदाजसोबतच उत्कृष्ठ फलंदाज महणजेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही लढत पाहायला मिळत आहे. ऑरेंज कॅप शर्यतीत जॉस बटलर 11 सामन्यांत 618 धावांसह आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल (451) दुसऱ्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिस (389) तिसऱ्या स्थानावर आहेत. तर शिखर धवन (381) चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर (375) पाचव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वच समाने रोमांचक झाले असून या पुढच्या सामन्यातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऑरेंज आणि पर्पल कॅपमधील रश्शी खेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आयपीएलचा कालचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या फलंदाजीतून 20 चेंडूत 25 धावा दिल्ली निघाल्या. दिल्ली संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ 17.4 षटकांत सर्वबाद 117 धावांवर आटोपला. त्यामुळे सामना पाहायला दिल्लीच्या प्रेक्षकांची काल निराशा झाली. काल चैन्नईच्या संघाची कामगिरी चांगली झाली. सीएसकेसाठी मोईन अलीने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 13 धावा देत 3 बळी घेतले. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मोईनने डीसीच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले.

- Advertisement -

चैन्नईला त्यांचे पुढील तीन सामने जिंकावे लागणार आहेत. कालच्या विजयासह विजयासह चैन्नई संघाचे 8 गुण झाले आहेत. काल झालेल्या पराभवानंतर दिल्लीचे केवळ 10 गुण झाले आहेत. आता चैन्नईला त्यांचे पुढील तीन सामने जिंकावे लागतील. तसेच प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना निव्वळ धावगती सुधारावी लागेल.


हेही वाचा – रन मशीन झाली डक मशीन; आयपीएलमध्ये कोहलीची 10 वर्षातील सर्वात खराब सरासरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -