घरक्रीडाIPL 2023 : कोलकाताच्या 'या' खेळाडूच्या लग्नात शाहरुख खान करणार डान्स

IPL 2023 : कोलकाताच्या ‘या’ खेळाडूच्या लग्नात शाहरुख खान करणार डान्स

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू रिंकू सिंह याने तुफानी फलंदाजी केली. सामन्यातील अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूच्या या फलंदाजीनंतर सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक करण्यात आले.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू रिंकू सिंह याने तुफानी फलंदाजी केली. सामन्यातील अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूच्या या फलंदाजीनंतर सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक करण्यात आले. अशातच आता कोलकाता संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यानेही रिंकूला अनोख गिफ्ट दिलं आहे. त्यानुसार, रिंकू सिंह याच्या लग्नाला शाहरुख खान जाणार आहे, याबाबत स्वत: रिंकूनी माहिती दिली. (ipl 2023 bollywood star and kkr owner shah rukh khan promise rinku singh to attend his marriage and dance 2023)

रिंकू सिंहच्या तुफानी फलंदाजीनंतर शाहरुख खान याने रिंकूचे कौतुक करत सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता रिंकू सिंहच्या लग्नालाही शाहरुख खान जाणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानने लग्नाला येण्याचा आणि लग्नात डान्स करणार असल्याचे अश्वासन दिल्याचे रिंकूने एका पोस्टद्वारे सांगितले.

- Advertisement -

गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात यश दयाल याच्या षटकात (सामन्यातील अखेरचं षटक) रिंकू सिंह याने 5 चेंडूवर 5 षटकार मारतत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यानंतर शाहरुख खान याने आपल्या ट्वीटरवरुन रिंकूसाठी खास पोस्ट लिहिली होती आता शाहरुख खान रिंकू सिंह याच्या लग्नाला जाणार आहे. त्याशिवाय लग्नात शाहरुख खान नाचणारही आहे. कोलकाता आणि आरसीबीच्या सामन्यानंतर रिंकू सिंह याने याबाबतचा खुलासा केला.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रिंकू सिंह याने दमदार कामगिरी केली आहे. रिंकू याने तुफानी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिंकूच्या या खेळीच्या जोरावर कोलकात्याने गुजरातविरोधात दमदार विजय मिळवला होता. रिंकू याने आतापर्यंत 8 सामन्यात 62.75 च्या सरासरीने आणि 158.86 च्या स्ट्राईक रेटने 251 धावा केल्या. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. रिंकू सिंह याने आतापर्यंत 15 चौकार आणि 18 षटकार लगावले आहेत. तसेच, क्षेत्ररक्षण करताना 5 जबरदस्त झेल घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ नीरज चोप्रासह कपिल देवही मैदानात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -