घर क्रीडा CSK Vs GT Final: गेला गेला गेला 'गिल' गेला गेला... गुजरातला पहिला...

CSK Vs GT Final: गेला गेला गेला ‘गिल’ गेला गेला… गुजरातला पहिला झटका

Subscribe

आज आयपीएलचा 16 वा हंगाम कोणाच्या नावावर होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यातच गुजरात टायटन्सने तुफानी फलंदाजीने सुरुवात केली. मात्र अवघ्या 37 धावा बनवत शुभमन गिल तंबूत परतला आहे. 

चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या संघात आज आयपीएलचा शेवटचा सामना खेळला जात आहे. आज आयपीएलचा 16 वा हंगाम कोणाच्या नावावर होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यातच गुजरात टायटन्सने तुफानी फलंदाजीने सुरुवात केली. मात्र अवघ्या 37 धावा बनवत शुभमन गिल तंबूत परतला आहे.  ( IPL 2023 CSK Vs GT Final Gujarat Shubhman Gill  Out on 37 runs  )

पावसाने व्यत्यय आणलेल्या IPL 2023 चा फायनल सामना आता राखीव दिवसावर पोहोचला आणि आज, 29 मे रोजी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपदाचा सामना राखीव दिवसांपर्यंत पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात तुफान फटकेबाजीने झाली. आयपीएलच्या 16 व्या हंगामात तुफान फटकेबाजी करणाऱ्या गीलने याही सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. परंतु रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धावा करत असताना धावचीत झाला आणि गिलने विकेट गमावला. रविंद्र जडेजा टाकत असलेल्या सातव्या ओव्हरमध्ये धोनीने पुन्हा एकदा आपल्या हातांनी जादू दाखवत गिलला स्टम्प आऊट केलं आहे. गिल 20 चेंडूत 39 धावा करुन आऊट झाला आहे.

- Advertisement -

गुजरात संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 11 ओव्हरमध्ये गुजरातने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. मैदानावर साहा 47 धावा आणि सुदर्शन 14 धावांवर खेळत आहे.

( हेही वाचा: CSK vs GT IPL 2023 : पावसामुळे आयपीएल आजचा अंतिम सामना रद्द; आज ठरणार जेतेपद विजेता )

कालचा सामना झाला होता रद्द

- Advertisement -

चेन्नई आणि गुजरात यांच्यात हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ७.३० वाजता सुरु होणार होता. मात्र, मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामन्यात व्यत्यय आला त्यानंतर आज हा सामना खेळवला जात आहे.

दरम्यान, आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा अखेरचा सामना असल्याची चर्चा रंगली असतानाच चेन्नईचा महत्त्वाचा फलंदाज अंबाती रायुडू याने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे चेन्नई संघाला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

 

- Advertisment -