Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम IPL 2023 Qualifier 1 : गुजरात-चेन्नई सामन्यापूर्वी दिल्ली पोलीसांकडून बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश

IPL 2023 Qualifier 1 : गुजरात-चेन्नई सामन्यापूर्वी दिल्ली पोलीसांकडून बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील पहिला उपांत्य फेरीचा (Qualifier 1) सामना आज (23 मे) होणार आहे. चेन्नई सुपर किंग (chennai super kings) आणि गुजरात टायटन्स (gujarat titans) यांच्यात होणार आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन्ही संघांमध्ये अतितटीची लढत पाहायला मिळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील पहिला उपांत्य फेरीचा (Qualifier 1) सामना आज (23 मे) होणार आहे. चेन्नई सुपर किंग (chennai super kings) आणि गुजरात टायटन्स (gujarat titans) यांच्यात होणार आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन्ही संघांमध्ये अतितटीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने आयपीएल सामन्यांदरम्यान सुरू असलेल्या मोठ्या बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. (Ipl 2023 Delhi Police Has Busted Ipl Betting Racket Running With Software 3 Arrested Csk Vs Gt Qualifier 1)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शाहदरा येथील राणी गार्डन परिसरातून याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंकज बजाज, अजय मल्होत्रा आणि अतुल वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून 4 मोबाईल फोन, चार्जरसह एक डेल आणि एसर लॅपटॉप, वाय-फाय राउटर जप्त करण्यात आले. दिल्ली पब्लिक गॅम्बलींग अॅक्ट, 1955 च्या कलम 3/4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

- Advertisement -

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले-ऑफ लढतींना आजपासून सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ दहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज झाला असेल. तसेच, हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करेल.

दरम्यान, या लढतीत पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. लखनौ सुपर जायंटस्‌ व मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत विजयी होणारा संघ क्वालिफायर वन लढतीत पराभूत झालेल्या संघाशी भिडणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – IPL 2023 : प्लेऑफमध्ये कोण मारणार बाजी? चेन्नई-गुजरातमध्ये खेळला जाणार पहिला क्वालिफायर सामना

- Advertisment -