Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 Eliminator : मुंबई आणि लखनऊमध्ये लढत; कोण मारणार बाजी?

IPL 2023 Eliminator : मुंबई आणि लखनऊमध्ये लढत; कोण मारणार बाजी?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा (eliminator) सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. लखनऊ आणि मुंबईतील हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा (eliminator) सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. लखनऊ आणि मुंबईतील हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. (IPL 2023 eliminator mumbai indians lucknow super giants mi vs lsg Chennai)

लखनऊ आणि मुंबई या दोन संघामध्ये आतापर्यंत 3 सामने झाले असून त्यात लखनऊने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई पराभवाचा बदला घेत उपांत्यफेरीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई आणि लखनौ यांच्यात होणार्‍या एलिमिनेटर सामन्यातील (eliminator match) विजयी संघ शुक्रवारी (26 मे) गुजरात टायटन्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर (Qualifire 2) सामना खेळेल.

- Advertisement -

पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा मागील काही सामन्यांतील फॉर्म पाहता त्यांचा उत्साह कायम आहे. गेल्या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने शानदार शतक ठोकले तर, कर्णधार रोहित शर्माही फॉर्ममध्ये परतला. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी ही सध्या चिंतेची बाब आहे. यासाठी मुंबई काय रणनिती आखणार हे पाहावं लागेल.

लखनऊ सुपर जायंट्स संघही यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. सलामीवीर क्विंटन डीकॉकची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. शिवाय, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनीही दमदार कामगिरी करत अनेक सामने जिंकले आहेत. लखनऊ संघाचा विजय या सुरुवातीच्या फळीवर अवलंबून आहे. तसेच अमित मिश्रा आणि रवी बिश्नोई यांच्या गोलंदाजीवरही लक्ष असेल.


- Advertisement -

हेही वाचा – “मी नेहमी CSK च्या संघात असेन पण…”, निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने टाकला पडदा

- Advertisment -