घरक्रीडाIPL 2023 FINAL : अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूने जाहीर केली...

IPL 2023 FINAL : अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाच अंतिम सामना आज होणार आहे. चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि गतवर्षीचा आयपीएल विजेता गुजरात टायटन्स संघ या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा अखेरचा सामना असल्याची चर्चा रंगली असतानाच चेन्नईचा महत्त्वाचा फलंदाज अंबाती रायुडू याने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे चेन्नई संघाला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. (Big blow to Chennai before the IPL 2023 FINAL The player announced his retirement)

अंबाती रायुडूने ट्विटर पोस्ट करताना आज तो शेवटचा आयपीएल सामना खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले की,  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या 2 उत्कृष्ट संघाकडून खेळताना 14 हंगामात 204 सामन्यात 11 वेळा प्लेऑफ, 8 वेळा फायनल आणि 5 ट्रॉफी. त्यामुळे आशा आहे की, आज सहावी जिंकू. हा खूप प्रवास होता. मी ठरवले आहे की आज रात्रीचा अंतिम सामना हा आयपीएलमधील माझा शेवटचा सामना असेल. ही महान स्पर्धा खेळताना मला खरोखर आनंद झाला आहे. तुम्हा सर्वांचे आभार. यावेळी यू टर्न नाही…

- Advertisement -

अंबाती रायुडूने 2002मध्ये 16 वर्षांचा असताना इंग्लंडविरूद्ध 19 वर्षांखालील संघाविरुद्ध 177 धावांची खेळी केली होती. रायुडू 2011मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. यानंतर त्याला 2014 मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आला. चेन्नईने त्याला 6.75 कोटींमध्ये खरेदी केले होते. त्याने आयपीएलमध्ये 14 हंगामात एकूण 204 सामन्यांत 186 डावामध्ये 4329 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 22 अर्धशतक मारली आहेत. 2018च्या पर्वात त्याने 16 सामन्यांत 43च्या सरासरीने 600 धावा करताना  चेन्नईला जेतेपद जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त   चोपून CSKच्या जेतेपदात मोठा वाटा उचलला होता.

धोनी आज निवृत्तीची घोषणा करू शकतो?
आयपीएलचा (IPL) आजचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विक्रमी 10व्या आयपीएल फायनलमध्ये खेळत आहे आणि त्यामुळे तो पाचवे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून अटकळ बांधली जात आहेत. त्यामुळे आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्जचे चाहते मोठ्या प्रमाणावर दिसून येतील. त्यामुळे आज यलो आर्मीने विजय मिळवला, तर 41 वर्षीय धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो. मात्र, महेंद्र सिंग धोनी या हंगामानंतर आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -