घरक्रीडायंदाची आयपीएल मोफत पाहायला मिळणार; अंबानींची स्पेशल ऑफर

यंदाची आयपीएल मोफत पाहायला मिळणार; अंबानींची स्पेशल ऑफर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेळापत्रक घोषित होताच सर्व ब्रॉडकॉस्टर क्रिकेटप्रेमींसाठी आपले प्लॅन जाहीर करत असतात. दरवर्षी टेलिकॉम कंपनी नवनवीन ऑफर्स देत असतात. अशातच यंदाच्या आयपीएलसाठी अंबानी यांनी स्पेशल ऑफर जाहीर केली आहे.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेळापत्रक घोषित होताच सर्व ब्रॉडकॉस्टर क्रिकेटप्रेमींसाठी आपले प्लॅन जाहीर करत असतात. दरवर्षी टेलिकॉम कंपनी नवनवीन ऑफर्स देत असतात. अशातच यंदाच्या आयपीएलसाठी अंबानी यांनी स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा जिओवर आयपीएलचे मोफत सामने पाहायला मिळणार आहेत. (Ipl 2023 Free live streaming on jio cinema from march 31)

स्टार इंडियाकडे टीव्हीचे हक्क आहेत आणि Viacom18 कडे डिजिटल अधिकार आहेत. Viacom Jio Cinema अॅपवर 18 सामने ऑनलाइन प्रसारित करणार आहे. त्यांनी आयपीएलचे सामने मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. जिओच्या या निर्णायामुळे क्रीडा चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

- Advertisement -

याबाबत रिलायन्स जिओने सांगितले की, युजर्स 4K रिझोल्यूशनमध्ये सामना पाहू शकतात. यापूर्वी आयपीएलच्या ऑनलाइन प्रसारणाचे अधिकार डिस्ने + हॉटस्टारकडे होते. त्या प्लॅटफॉर्मवर सामने पाहण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागत होते.

आयपीएलच्या (IPL) 16 व्या पर्वाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. बीसीसीआयने नुकतेच याचं वेळापत्रक जारी केले आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई या संघात पहिला सामना रंगणार आहे. प्रत्येक संघाने आयपीएलची तयारी सुरु केली आहे.

- Advertisement -

कधीपासून सुरू होणार आयपीएल स्पर्धा

  • 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे.
  • गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.
  • 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.
  • 28 मे रोजी आयपीएल 2023 चा अंतिम सामना होणार आहे.
  • आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत.
  • लीग राऊंडमध्ये 10 संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे.
  • 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत.
  • आयपीएल 2023 चे आयोजन भारतातच होणार आहे.
  • देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत.
  • 10 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

हेही वाचा – भारतीय संघाच्या स्टार वेगवान गोलंदाजावर दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून परतला घरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -