Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 : शेवटच्या षटकात कोलकाता सामना जिंकला; हैदराबादचा 5 धावांनी पराभव

IPL 2023 : शेवटच्या षटकात कोलकाता सामना जिंकला; हैदराबादचा 5 धावांनी पराभव

Subscribe

नवी दिल्ली : शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) ५ धावांनी पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सामना जिकंला. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना 3 धावा देताना 1 विकेट घेत वरुण चक्रवर्तीने उत्तमिरत्या बचाव केला.

आयपीएल 2023 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला. फक्त 35 धावांवर कोलकाता संघाच्या 3 विकेट पडल्या होत्या. जेसन रॉय (20), व्यंकटेश अय्यर (7) आणि रहमानुल्लाह गुरबाज खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर कर्णधार नितिश राणा आणि रिंकू सिंग यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. परंतु नितिश राणा 31 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर रसेलने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला, पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर अंकुल रॉय सोडल्यास एकही फलंदाज 10 चा आकडा पार करू शकला नाही. रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावांचे योगदान दिले. त्यामुळे कोलकाता संघाने निर्धारीत 20 षटकात 9 विकेट गमावत 171 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून टी. नटराजन आणि मार्को जॅनसेन यांनी सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, मार्करम आणि मार्कंडे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

कोलकाताकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. 54 धावांवर संघाच्या 4 विकेट पडल्या होत्या. अभिषेक शर्मा (9), मयांक अग्रवाल (18), राहुल त्रिपाठी (20) आणि हॅरी ब्रूक खाते न उघडता बाद झाले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या संघाला सावरण्यासाठी कर्णधार एडन मार्करम आणि हेनरिक कालसन यांनी आक्रमक रुप धारण केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 85 चेंडूत 70 धावांची भागिदारी केली. त्यामुळे सामना सहज जिंकतील असे वाटत असताना कालसन 20 चेंडूंत 1 चौकार आणि 3 षटाकारांच्या मदतीने 36 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर मार्करम 40 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी करून बाद झाला. आठव्या क्रमांकावर आलेला मार्को जॅनसेन फक्त 1 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना अब्दुल समद 18 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाल्यामुळे हैदराबाद संघाला अवघ्या 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. कोलकात्याकडून शार्दूल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी सर्वाधिक 2 विकेट, हर्षित राणा, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -